देहलीत भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या, तर मुलगा घायाळ !

देहलीमधील पोलीस खाते केंद्रातील भाजप सरकारच्या अखत्यारीत असतांना अशा प्रकारच्या घटना घडणे अपेक्षित नाही !

‘अ सुटेबल बॉय’ वेब सिरीजच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार ! – मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

वेब सिरीजमध्ये मंदिरामध्ये मुसलमान प्रियकराकडून हिंदु प्रेयसीचे चुंबन घेण्याचे दृश्य आणि ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन ! वास्तविक केंद्र सरकारनेच अशा प्रकारच्या वेब सिरीजवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे !

केरळ सरकारकडून सामाजिक माध्यमांवरून अपकीर्ती करणार्‍यांवर कारवाई करणार्‍या कायद्याच्या कार्यवाहीला स्थगिती

केरळ सरकारने काढलेल्या अध्यादेशाला मागे घेतले आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी ‘सध्या या कायद्याची कार्यवाही करण्यात येणार नाही’, असे म्हटले आहे.

बंगालमध्ये भाजप महिला नेत्याच्या वाहन ताफ्यावर आक्रमण

भाजपच्या नेत्या भारती घोष यांचा वाहनताफा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अडवून आक्रमण केले, असा आरोप घोष यांनी केला.

परिस्थिती पाहून ८ ते १० दिवसांमध्ये दळणवळण बंदीचा निर्णय घेतला जाईल ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

दिवाळीच्या कालावधीत रस्त्यांवर झालेल्या गर्दीमुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, तसेच तज्ञांकडून कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे पुढील ८ ते १० दिवसांमध्ये परिस्थिती पाहून दळणवळण बंदीचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २२ नोव्हेंबर या दिवशी दिली.

हुतात्मा सैनिक संग्राम पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात निगवे खालसा (कोल्हापूर) येथे अंत्यसंस्कार

हुतात्मा सैनिक संग्राम पाटील यांचा मुलगा शौर्य याच्या हस्ते अग्नी देण्यात आला.

एन्.सी.बी.चे तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह कर्मचार्‍यांवर आक्रमण

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचे (एन्.सी.बी. चे) तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह इतर कर्मचार्‍यांवर आक्रमण करण्यात आले आहे. अमली पदार्थ विकणार्‍यांकडून (ड्रग्ज पेडलर्सकडून) हे आक्रमण मुंबईतील गोरेगावमध्ये २२ नोव्हेंबरच्या सायंकाळी केले आहे.

विमान, रेल्वे यांनी महाराष्ट्रात येणार्‍यांना कोरोनाची चाचणी सक्तीची

देहली, राजस्थान, गुजरात, गोवा या चार राज्यांमधून महाराष्ट्रात विमान, रेल्वे यांद्वारे येणार्‍यांना कोरोनाची चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. या प्रवाशांचा कोरोनाचा आर्.टी.पी.सी.आर्. अहवाल हा ‘निगेटिव्ह’ असणे आवश्यक आहे, असा आदेश महाराष्ट्र सरकारने काढला आहे.

बिहारमध्ये लव्ह जिहादच्या विरोधात कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रात विचार करू ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

बिहारमध्ये लव्ह जिहादच्या विरोधात कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रात विचार करू, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश येथे लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्यात येत आहे.

धुपखेडा (जिल्हा संभाजीनगर) येथील साई मंदिरात चोरी

संभाजीनगर-पैठण रस्त्यावरील धुपखेडा येथील प्रसिद्ध असलेल्या श्री साईबाबांच्या मंदिरात २३ नोव्हेंबरच्या पहाटे चोरट्यांनी कुलूप तोडून चोरी केली. यामध्ये साईबाबांच्या मूर्तीचा चांदीचा मुकुट, २ दानपेट्या आणि मंदिराच्या कपाटातील सोन्या-चांदीचे अलंकार चोरट्यांनी पळवले आहेत.