
मुंबई – केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचे (एन्.सी.बी. चे) तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह इतर कर्मचार्यांवर आक्रमण करण्यात आले आहे. अमली पदार्थ विकणार्यांकडून (ड्रग्ज पेडलर्सकडून) हे आक्रमण मुंबईतील गोरेगावमध्ये २२ नोव्हेंबरच्या सायंकाळी केले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे, असे वृत्त ‘ए.एन्.आय’ वृत्तसंस्थेने दिले आहे. या प्रकरणी पुढील चौकशी चालू आहे. या आक्रमणात समीर वानखेडेंसह एकजण घायाळ झाला आहे. समीर वानखेडे हे कैरी मेंडिस नावाच्या आरोपीला पकडण्यास गेले होते. त्या वेळी हे आक्रमण करण्यात आले. कैरी मेंडिससह अन्य तिघांना अटक करण्यात आली आहे.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात चित्रपट क्षेत्रातील (बॉलिवूड) लोकांचे संबंध उघड झाले, तेव्हापासून केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने अनेक कलाकारांवर कारवाई केली आहे.
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
US Attack on the Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
AL Falah University : हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण