धुपखेडा (जिल्हा संभाजीनगर) येथील साई मंदिरात चोरी

दानपेट्यांसह सोने-चांदीचे अलंकार चोरट्यांनी पळवले

असुरक्षित मंदिरे

 

धुपखेडा (जिल्हा संभाजीनगर) – संभाजीनगर-पैठण रस्त्यावरील धुपखेडा येथील प्रसिद्ध असलेल्या श्री साईबाबांच्या मंदिरात २३ नोव्हेंबरच्या पहाटे चोरट्यांनी कुलूप तोडून चोरी केली. यामध्ये साईबाबांच्या मूर्तीचा चांदीचा मुकुट, २ दानपेट्या आणि मंदिराच्या कपाटातील सोन्या-चांदीचे अलंकार चोरट्यांनी पळवले आहेत. मंदिरातील ‘सीसीटीव्ही’ छायाचित्रकाचे चित्रीकरण पडताळले असता ३ अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचे निदर्शनास आले आहे; मात्र चोरट्यांनी तोंडवळ्याला रूमाल बांधलेला असल्याने ओळख पटलेली नाही. पोलिसांनी या ठिकाणी तात्काळ श्‍वान पथक बोलावून चोरट्यांचा मार्ग शोधण्याचे काम चालू केले. यामध्ये मंदिरापासून काही अंतरावर एक तोडलेली दानपेटी सापडली. पैठण तालुक्यातील अनेक गावांत चोरीच्या घटना घडत आहेत. (हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक) त्यामुळे पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (अशी मागणी नागरिकांना का करावी लागते, पोलिसांच्या हे लक्षात येत नाही का ? – संपादक)