बिहारमध्ये लव्ह जिहादच्या विरोधात कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रात विचार करू ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

मुंबई – बिहारमध्ये लव्ह जिहादच्या विरोधात कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रात विचार करू, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश येथे लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्यात येत आहे. त्यामुळे भाजपच्या काही नेत्यांकडून महाराष्ट्रात हा कायदा कधी आणणार ? अशी विचारणा केली जात होती. त्यावर संजय राऊत यांनी वरील भाष्य केले आहे.

ते म्हणाले की, लव्ह जिहादविषयी माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश येथे कायदा होऊ दे; पण बिहारमध्ये जेव्हा नितीश कुमार कायदा बनवतील, तेव्हा त्या कायद्याचा आम्ही अभ्यास करू आणि त्यानंतर राज्यात या कायद्याविषयी विचार करू. लव्ह जिहादपेक्षा अर्थव्यवस्था, बेरोजगारी, महागाई ही सूत्रे सर्वांत मोठी आहेत.