देहलीत भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या, तर मुलगा घायाळ !

देहलीमधील पोलीस खाते केंद्रातील भाजप सरकारच्या अखत्यारीत असतांना अशा प्रकारच्या घटना घडणे अपेक्षित नाही !

भाजपचे नेते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते झुल्फिकार कुरैशी यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून केली हत्या

नवी देहली – येथील सुंदरनगरी परिसरातील मशिदीबाहेर भाजपचे नेते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते झुल्फिकार कुरैशी यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. ते सकाळी नमाजपठणासाठी जात असतांना हा गोळीबार करण्यात आला.

या वेळी आक्रमणकर्त्यांनी झुल्फिकार कुरेशी यांच्या मुलावरही चाकूने आक्रमण केले. यात तो घायाळ झाला. त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस याचे अन्वेषण करत आहेत.