शिक्षणाधिकार्‍यांनी दिलेला आदेश मागे न घेतल्यास २५ डिसेंबरला आंदोलन करणार ! – प्राथमिक शिक्षक संघटना, सिंधुदुर्ग

इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग चालू करणे, शिक्षकांची शाळेतील उपस्थिती यांविषयी प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी निर्गमित केलेले आदेश हे शासनाच्या कोरोना काळातील निर्बंधाचे उल्लघन करणारे आहेत.

राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी गोवा सज्ज

राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुक्तीदिनाच्या निमित्ताने गोमंतकियांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमासाठी मर्यादित मान्यवरांनाच निमंत्रित करण्यात आल्याने या कार्यकमाचे संपूर्ण गोमंतकियांसाठी सर्व वृत्तवाहिन्यांवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

जिल्हा पंचायतीचा पराभव एक आव्हान म्हणून स्वीकारणार ! – दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते

जिल्हा पंचायतीत पक्षाचा झालेला पराभव आम्ही एक आव्हान म्हणून स्वीकारत आहोत. गोमंतकियांच्या जिव्हाळ्याचे प्रश्‍न हाताळून आम्ही यापुढे गोमंतकियांना एक चांगले नेतृत्व देणार आहोत.

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी युवकाला पोलीस कोठडी

तालुक्यातील एका गावात शाळेत जाणार्‍या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपी ऋतिक कमलाकर कदम याला न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी बजावली.

भारतीय तटरक्षक दलाच्या ‘सुजित’ गस्ती जहाजाचे लोकार्पण

या ‘ऑफ शोर’ गस्ती जहाजाचे ‘डिझाईन’, तसेच जहाजाची बांधणी ‘गोवा शिपयार्ड’ने केली आहे. जहाजात तंत्रज्ञान, ‘नेव्हीगेशन’, दळणवळण यंत्रणा, ‘सेन्सर’ आदी आधुनिक साधनसुविधा बसवण्यात आल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र निर्माण करण्याची आवश्यकता ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

धुळे येथील युवा धर्मप्रेमींसाठी ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यान

१०० कोटी हिंदू असलेल्या भारताला संवैधानिकदृष्ट्या ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘धर्मनिरपेक्ष’ या गोंडस नावाखाली हिंदूंवर आघात होत आहेत.

वाघापासून संरक्षण होण्यासाठी ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावणार

टिपेश्‍वर अभयारण्याशेजारील ७२ गावांत वाघांची पुष्कळ दहशत वाढली आहे.

पाण्यासाठी थेट पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन

पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी सामान्यांना आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद आहे !

६० लाख टन साखर निर्यातीस अनुमती : यंदाच्या हंगामात साखरेचे दर चांगले

यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच साखर कारखानदारांमध्ये समाधान आहे.