६४ कोटी ३६ लाख रुपयांचे अमली पदार्थ नष्ट !

आतंकवादविरोधी पथकाने ४ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले (अंदाजे किंमत ६४ कोटी ३६ लाख रुपये )अमली पदार्थ नवी मुंबईतील तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी लि. येथील बंदिस्त भट्टीमध्ये जाळून नष्ट केले.  

इराणमध्ये हिजाब न घालणार्‍या महिलांवर पुन्हा कारवाई चालू !

‘गश्त-ए-एर्शाद’ या सशस्त्र पथकाकडून गस्त घातली जात आहे. हिजाब न घालणार्‍या महिलांना प्रथम चेतावणी दिली जाते. तरीही महिलेकडून हिजाब घातला जात नसेल, तर कायदेशीर कारवाई करण्यात येते.

हिंदु जनजागृती समिती देत असलेले धर्मशिक्षण घेऊन ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात लढा देऊ !  

भारत देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाली. पाकिस्तान हा ‘मुस्लिम देश’ आणि भारत मात्र ‘निधर्मी देश’ ही संकल्पनाच अयोग्य आहे. काँग्रेसने जाणीवपूर्वक हिंदु धर्मावर अन्याय केला आहे.

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील मशिदीच्या बाहेर रस्त्यावर २५ मुसलमानांकडून नमाजपठण !

रस्त्यावरील नमाजपठणाला विरोध करण्यासाठी अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रस्त्यावर हनुमान चालिसा आणि सुंदरकांड यांचे पाठण करण्यास आरंभ केला होता. यावरून रस्त्यावरील नमाजपठणावर बंदी घालण्यात आली होती.

भूकेकंगाल पाक राजधानी इस्लामाबादचे आंतरराष्ट्रीय विमानतळ विदेशी आस्थापनास चालवायला देणार !

भूकेकंगाल झालेल्या आणि कर्जाखाली दबलेल्या जिहादी पाकिस्तानवर त्याच्या राजधानीतील आंतरराष्ट्रीय विमानतळ विदेशी आस्थापनाला चालवायला देण्याची पाळी आली आहे. यासाठी त्याने एका समितीची स्थापनाही केली आहे.

नेपाळमध्ये चीनने उभारलेल्या विद्युत् प्रकल्पांमध्ये निर्माण केलेली वीज भारत खरेदी करणार नाही !

भारत आता जलविद्युत प्रकल्पांची संपूर्ण चौकशी करू पहात आहे. अशा परिस्थितीत आता चीनने निर्माण केलेली वीज नेपाळ भारताला विकू शकणार नाही.

सीमा हैदर हिला ३ दिवसांत पाकमध्ये हाकलून लावा अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – गोरक्षा हिंदु दलाची चेतावणी

गोरक्षा हिंदु दलाने केंद्र सरकारनला चेतावणी दिली आहे, ‘येत्या ३ दिवसांत जर सीमा हैदर हिला भारतातून बाहेर हाकलून लावले नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन करू.’ गोरक्षा हिंदु दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष वेद नागर यांनी व्हिडिओ बनवून ही चेतावणी दिली आहे.

मध्यप्रदेशात वन्दे भारत एक्सप्रेसला लागली आग ! : सर्व प्रवासी सुखरूप

मध्यप्रदेशातील बीना येथे ‘वन्दे भारत’ या एक्सप्रेसच्या सी-१४ या डब्याला आग लागली. प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार बॅटरीला आग लागली होती. या डब्यातील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्यानंतर काही वेळातच ही आग विझवण्यात आली.

रशिया भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्रे विकत घेण्याची शक्यता !

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला १ वर्षाहून अधिक काळ उलटला आहे. या युद्धामुळे दोन्ही देशांच्या शस्त्रांमध्ये घट झाली आहे.

अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यास नकार दिल्याने विरोधकांचा सभात्याग !

डॉ. नीलम गोर्‍हेंविरोधात प्रस्ताव मांडायचा असेल, तर त्याची प्रक्रिया असते. कायद्यातील तरतुदीनुसार असा प्रस्ताव मांडता येईल; मात्र त्यासाठी सभागृहाला वेठीस धरता येणार नाही-देवेंद्र फडणवीस