सीमा हैदर म्हणते ‘मी पाकमध्ये परत गेल्यास मला ठार मारले जाईल !’

नोएडा (उत्तरप्रदेश) – गोरक्षा हिंदु दलाने केंद्र सरकारनला चेतावणी दिली आहे, ‘येत्या ३ दिवसांत जर सीमा हैदर हिला भारतातून बाहेर हाकलून लावले नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन करू.’ गोरक्षा हिंदु दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष वेद नागर यांनी व्हिडिओ बनवून ही चेतावणी दिली आहे. या संदर्भात उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथक चौकशी करत आहे.
सौजन्य टीव्ही 9 भारतवर्ष
१. सीमा हैदर ही पाकमधील विवाहित महिला तिच्या ४ मुलांसह पळून आली असून सध्या ती नोएडा येथील सचिन नावाच्या तिच्या प्रियकराकडे रहात आहे. पबजी या ऑनलाईन खेळाच्या माध्यमांतून या दोघांची ओळख झाली आणि त्यातून प्रेम निर्माण झाले. यामुळे सीमा कराचीहून दुबई, दुबईहून नेपाळ आणि नेपाळमधून देहली येथे आली आहे. हिंदु धर्म स्वीकारून ती सचिनशी विवाह करणार होती. ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सीमा आणि सचिन यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना जामीन दिल्याने ते सध्या बाहेर आहेत.
२. नागर यांनी म्हटले आहे की, सीमा हैदर सामान्य महिला नाही. ही पाकिस्तानची हेर आहे. ती देशासाठी मोठा धोका निर्माण करू शकते. इयत्ता ५ वी अनुत्तीर्ण असलेली ही महिला अस्खलीत इंग्रजी कशी काय बोलू शकते ?
३. दुसरीकडे सीमा हैदर हिने म्हटले आहे की, मी पुन्हा पाकमध्ये जाणार नाही; कारण तेथे गेल्यास मला ठार मारले जाईल. काहीही झाले, तरी मी भारतातच राहीन. मी सचिन समवेतच राहू इच्छिते.
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !