सरकारविरोधात विरोधकांचे आंदोलन !

या आंदोलनात राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार समर्थक एकाही आमदाराची उपस्‍थिती नव्‍हती. ‘विरोधी पक्षनेते पदाच्‍या निवडीसाठी काँग्रेसच्‍या नेत्‍यांची बैठक चालू झाली आहे. विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचाच असेल’, असे बाळासाहेब थोरात यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

अविश्‍वास ठराव प्रविष्‍ट केल्‍यानंतर उपसभापतींना पदावर बसण्‍याचा नैतिक अधिकार नाही ! – अनिल परब, आमदार, ठाकरे गट

विधान परिषदेच्‍या उपसभापती म्‍हणून डॉ. नीलम गोर्‍हे काम पहात आहेत. त्‍यांनी स्‍वत:हून पक्षाचे सदस्‍यत्‍व सोडलेले आहे. १० व्‍या परिशिष्‍टातील कायद्याच्‍या २ ‘अ’ मध्‍ये अपात्रतेची तरतूद आहे. त्‍याअंतर्गत आम्‍ही त्‍यांच्‍या विरोधात अपात्रतेची याचिका प्रविष्‍ट केली आहे.

पाशवी बहुमताच्‍या बळावर विधान परिषदेचे कामकाज चालू देणार नाही ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

महाविकास आघाडीच्‍या सर्व आमदारांनी विधानसभेचे कामकाज स्‍थगित झाल्‍यानंतर राज्‍यपालांची भेट घेतली. राज्‍यपालांनी याविषयी सकारात्‍मक चर्चा केली असून आम्‍ही त्‍यांच्‍या निर्णयाची प्रतीक्षा करत आहोत, असेही ते म्‍हणाले.

लव्‍ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायद्यासाठी अधिवेशनात पावले उचलू ! – नितेश राणे, आमदार, भाजप

लव्‍ह जिहाद विरोधी कायदा निर्माण होणे आवश्‍यक आहे. यंदाच्‍या विधानसभा अधिवेशनात या कायद्याच्‍या संदर्भात पुढचे पाऊल उचलले जाईल. सत्तेत नव्‍याने सहभागी झालेल्‍या अजित पवार यांचाही हिंदुत्‍ववादी सरकारला पाठिंबा आहे.

रामनाथ (अलिबाग) येथे तोतया पोलीस उपनिरीक्षकास अटक !

वाहतूक शाखेत पोलीस उपनिरीक्षक म्‍हणून कार्यरत असल्‍याचे सांगत शाळकरी मुलांना मार्गदर्शनासाठी आल्‍याचे सांगणार्‍या तोतया पोलिसाला महाड पोलिसांनी अटक केली आहे. अनिकेत मिस्‍त्री असे त्‍याचे नाव आहे. 

विरोधी पक्षनेत्‍याविना विधीमंडळाच्‍या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ !

अजित पवार यांनी सरकारला पाठिंबा देऊन १५ दिवस होऊनही महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेत्‍याची निवड झालेली नाही. त्‍यामुळे विरोधी पक्षनेत्‍याविनाच विधीमंडळाच्‍या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ झाला.

अंतराळशास्‍त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्‍या पत्नी, ज्‍येष्‍ठ गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे पुण्‍यात निधन !

ज्‍येष्‍ठ गणितज्ञ, शास्‍त्रज्ञ आणि लेखिका डॉ. मंगला नारळीकर (वय ७९ वर्षे) यांचे येथील रहात्‍या घरी निधन झाले. अंतराळशास्‍त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्‍या त्‍या पत्नी होत्‍या.

कोपरखैरणे येथे पू. संभाजी भिडेगुरुजी यांची सभा निर्विघ्‍नपणे पार पडली !

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान, नवी मुंबई विभागाच्‍या वतीने पू. संभाजी भिडेगुरुजी यांची कोपरखैरणे येथे १६ जुलै या दिवशी जाहीर सभा आयोजित करण्‍यात आली होती. वंचित बहुजन आघाडीसह अन्‍य संघटनांनी या सभेला विरोध केला होता; मात्र पोलिसांच्‍या चोख बंदोबस्‍तामुळे सभा निर्विघ्‍नपणे पार पडली.

स्‍थगन प्रस्‍तावावरील चर्चेस अध्‍यक्षांच्‍या नकारामुळे विरोधकांचा सभात्‍याग !

‘राज्‍यातील शेतकर्‍यांच्‍या प्रश्‍नावर चर्चा करण्‍यात यावी’, अशी त्‍यांनी मागणी केली; मात्र विधानसभा अध्‍यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा प्रस्‍ताव फेटाळला.

अयोध्या येथील श्रीराममंदिराला पुढील १ सहस्र वर्षे काहीही होणार नाही ! – श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास

मंदिरातील प्रत्येक कलाकृती आणि भाग अशा प्रकारे बनवण्याचा प्रयत्न आहे की, पुढील १ सहस्र वर्षे त्याला काहीही होणार नाही, तसेच त्याच्या डागडुजीचीही आवश्यकता भासणार नाही.