मध्यप्रदेशात वन्दे भारत एक्सप्रेसला लागली आग ! : सर्व प्रवासी सुखरूप

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील बीना येथे ‘वन्दे भारत’ या एक्सप्रेसच्या सी-१४ या डब्याला आग लागली. प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार बॅटरीला आग लागली होती.

या डब्यातील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्यानंतर काही वेळातच ही आग विझवण्यात आली. ही एक्सप्रेस राणी कमलापती स्थानकावरून देहली येथे जात होती.