श्रीराम मंदिराची मोहीम कोरोनाचे नियम पाळून राबवली जाऊ शकते ! – मद्रास उच्च न्यायालय

शासनाने घेतलेल्या भूमिकेस मान्यता देता येत नाही, असे सांगत मद्रास उच्च न्यायालयाने श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या जिल्हा संयोजकांना मदुराई येथील त्यांच्या वाहनाद्वारे श्रीराममंदिराविषयी जनजागृती मोहीम राबवण्याची अनुमती दिली.

नोटांवर नेताजी बोस यांचे छायाचित्र छापण्यास केंद्र सरकारला आदेश देण्याची मागणी मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली !

नेताजी सुभाषचंद्रच नव्हे, तर देशातील असंख्य क्रांतीकारकांनी देशासाठी प्राणांचे बलीदान दिले आहे. हे पहाता केवळ ‘एका’च नेत्याचे छायाचित्र नोटांवर का ?, असा प्रश्‍न नेहमीच भारतियांच्या मनात येतो !

वर्ष २०२१ च्या आय.पी.एल्. स्पर्धेचे मुख्य प्रायोजकत्व पुन्हा चीनच्या विवो आस्थापनाला !

यातून बीसीसीआयची ढोंगी देशभक्ती दिसून येते ! बीसीसीआयला देशभक्तीपेक्षा पैसा अधिक महत्त्वाचा वाटत असल्याने त्याने पुन्हा चीनच्या आस्थापनाला प्रायोजकत्व दिले, अन्यथा त्याने भारतीय किंवा अन्य एखाद्या विदेशी आस्थापनाला ते दिले असते !

तमिळनाडूतील इस्लामी संघटनांची मारवाडी समाजाला तमिळनाडू सोडून जाण्याची धमकी

हिंदूंमधील एकेका समाजाला लक्ष्य करण्याचा धर्मांधांचा हा नवीन कट आहे ! त्यामुळे हिंदूंनी संघटित होऊन याचा विरोध केला पाहिजे आणि अशा संघटनांवर कारवाई करण्यास राज्य आणि केंद्र सरकारला भाग पाडले पाहिजे !

तमिळनाडूमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासाठी १ सहस्र वर्षे प्राचीन मंदिराची ३५ एकर भूमी कह्यात घेण्यास संमती !

अशा प्रकारचा आदेश चर्च किंवा मशीद यांच्या भूमीच्या संदर्भात देण्यात आला असता का ? आणि तो त्यांनी मान्य केला असता का ?, असे प्रश्‍न हिंदूंच्या मनात उत्पन्न होतात !

‘मुरुगा’ देवतेला ‘तमिळ भाषेची देवता’ असे नाव देता येणार नाही ! – मद्रास उच्च न्यायालय

हिंदूंच्या अनेक देवता या शास्त्रे आणि कला यांच्या देवता आहेत. हिंदूंच्या धर्मशास्त्रात तसा उल्लेख आहे. त्यामुळे असा निर्णय देतांना न्यायालयाने हिंदूंचे सर्वोच्च गुरु शंकराचार्य यांचे मत विचारात घ्यावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

हिंदु धर्माचा उपहास करणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍याला मद्रास उच्च न्यायालयाने फटकारले !

अशांना केवळ शाब्दिक फटकारे लगावण्यासह त्यांना कारागृहात डांबण्याचीही शिक्षा न्यायालयाने करावी, असेच हिंदूंना वाटते !

(म्हणे) ‘नागपूरचे ‘हाफ चड्डीवाले’ तमिळनाडूचे भविष्य कधीच ठरवू शकत नाहीत !’

केवळ पंचा नेसून, डोक्यावर पांढरी टोपी घालून, कोटवर गुलाब लावून देशाची फाळणी करणार्‍या आणि बहुसंख्य हिंदूंचे भविष्य नष्ट करणार्‍या काँग्रेसवाल्यांनी देशाचे किती भले केले ?, याचे उत्तर राहुल गांधी यांनी दिले पाहिजे !

ख्रिस्ती धर्मप्रचारक पॉल दिनाकरन् यांच्या ठिकाणांवर घातलेल्या धाडीत १२० कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त !

हिंदूंच्या संतांच्या आश्रमांवर, त्यांच्या कार्यावर टीका करतांना पैशांचा हिशोब मागणारे कधी ‘चर्च, मशिदी, मदरसे यांना पैसा कुठून मिळतो ?’, याची माहिती मागत नाहीत, हे लक्षात घ्या !

तमिळनाडूमध्ये प्राचीन मंदिरांच्या भिंतींवर क्रॉस रेखाटून त्याला चर्चचे स्वरूप देण्याचा प्रयत्न !

तमिळनाडूत अण्णाद्रमुकच्या जयललिता मुख्यमंत्री असतांना खोट्या आरोपांखाली शंकराचार्य यांना अटक करून त्यांना कारागृहात डांबण्यात आले. आज त्याच पक्षाचे सरकार सत्तेत असतांना तेथे हिंदुविरोधी कारवायांमध्ये वाढ झाल्यास आश्‍चर्य ते काय ?