ख्रिस्ती धर्मप्रचारक पॉल दिनाकरन् यांच्या ठिकाणांवर घातलेल्या धाडीत १२० कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त !

आयकर विभागाने २८ ठिकाणांवर धाडी घातल्या !

  • ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडे इतका पैसा कुठून आला, याचा शोध घेऊन त्याची माहिती भारतियांना दिली पाहिजे !
  • हिंदूंच्या संतांच्या आश्रमांवर, त्यांच्या कार्यावर टीका करतांना पैशांचा हिशोब मागणारे कधी ‘चर्च, मशिदी, मदरसे यांना पैसा कुठून मिळतो ?’, याची माहिती मागत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • अशा भ्रष्टाचार्‍यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात छी थू होण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांनी प्रयत्न केला पाहिजे !

चेन्नई (तमिळनाडू) – राज्यातील ख्रिस्ती धर्मप्रचारक पॉल दिनाकरन् यांचे निवासस्थान आणि कार्यालय मिळून २८ ठिकाणांवर आयकर विभागाने घातलेल्या धाडीतून १२० कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यात साडेचार किलो वजनाच्या सोन्याचाही समावेश आहे. दिनाकरन्  यांची इस्रायल, सिंगापूर, ब्रिटन, अमेरिका आदी १२ देशांमध्ये असलेली आस्थापने यांची २०० हून अधिक बँक खाती आढळली.

ख्रिस्ती धर्मप्रचारक पॉल दिनाकरन्

‘जीजस कॉल्स’ ही पॉल दिनाकरन् यांच्याकडून चालवली जाणारी संस्था आहे, जी संपूर्ण तमिळनाडूमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार आणि प्रसार करते.