‘मुरुगा’ देवतेला ‘तमिळ भाषेची देवता’ असे नाव देता येणार नाही ! – मद्रास उच्च न्यायालय

हिंदूंच्या अनेक देवता या शास्त्रे आणि कला यांच्या देवता आहेत. असा केवळ भाविक हिंदूंची श्रद्धा आहे, असे नाहीत, तर हिंदूंच्या धर्मशास्त्रात तसा उल्लेख आहे. त्यामुळे असा निर्णय देतांना न्यायालयाने हिंदूंचे सर्वोच्च गुरु शंकराचार्य यांचे मत विचारात घ्यावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

‘मुरुगा’ देवता

चेन्नई – मद्रास उच्च न्यायालयाने तमिळ भाषेची देवता म्हणून ‘मुरुगा’ देवतेचे नाव देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने आदेशात म्हटले की, राज्यघटनेच्या प्रस्तावनेने देशाच्या धर्मनिरपेक्ष स्वरूपावर जोर दिला आहे. अशी मागणी मान्य केली, तर या महान राष्ट्राच्या संघराज्य आणि धर्मनिरपेक्ष स्वरूपाच्या पायालाच हानी पोचेल. याचिकाकर्त्याला ही मागणी करण्याचे उचित कारण असू शकते; मात्र ‘देवता मुरुगा ही तमिळ भाषेचे देवता आहे, हे मान्य करा’,  अशी विनंती विचारात घेणे शक्य नाही.

न्यायालयाने पुढे म्हटले की, केवळ देवता मुरुगाला तमिळ भाषेचा एकमेव प्रतिनिधी म्हणून ओळखणे योग्य ठरणार नाही. विविध साहित्यिक व्यक्तींच्या योगदानाने तमिळ भाषा समृद्ध झाली आहे. देवाची स्तुती म्हणून ही भाषा विकसित केली गेली आहे. हिंदु धर्माच्या अनेक देवता आहेत. तमिळ भाषेचा एकमेव प्रतिनिधी म्हणून एका देवाला घोषित करण्याचा प्रयत्न म्हणजे तमिळ भाषेतील साहित्यिक लेखनाद्वारे देव मुरुगाखेरीज अन्य देवतांची स्तुती करता येत नाही, असे होईल. या प्रकरणाच्या दृष्टीने याचिका मान्य केली जात नाही.