‘हिंदु एकता आंदोलन, कोल्हापूर’चा राजेश क्षीरसागर आणि अमल महाडिक यांना पाठिंबा !
मिरजकर तिकटी येथे हिंदु एकता आंदोलनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार श्री. राजेश क्षीरसागर आणि भाजपचे उमेदवार माजी आमदार श्री. अमल महाडिक यांना हिंदुत्वाच्या सूत्रावर पाठिंबा घोषित करण्यात आला आणि त्यांना तसे पत्र देण्यात आले.