Hindu And Sikh Condemned Temple Attack :  देहलीतील कॅनडाच्या दूतावासाबाहेर हिंदु आणि शीख संघटनांकडून निदर्शने

कॅनडातील हिंदूंच्या मंदिरावरील आक्रमणाचा केला निषेध

नवी देहली – कॅनडाच्या ब्रॅम्पटन शहरात हिंदु सभा मंदिरावर झालेल्या आक्रमणाच्या विरोधात देहलीतील कॅनडाच्या दूतावासावर १० नोव्हेंबरला मोर्चा काढण्यात आला. हिंदु संघटना आणि ‘हिंदू सिख ग्लोबल फोरम’ यांच्या कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढला आणि निदर्शने केली. यात महिला आणि वृद्ध यांनीही सहभाग घेतला.‘हिंदू आणि शीख एकत्र आहेत’ आणि ‘भारतीय लोक कॅनडातील मंदिरांची विटंबना सहन करणार नाहीत’, असे फलक आंदोलक करणार्‍यांच्या हातात होते.

मोर्चाला अडवण्यासाठी देहली पोलिसांनी कॅनडाच्या दूतावासाबाहेर अडथळे (बॅरिकेड्स) लावले होते, तसेच मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांनी दूतावासासमोरील ३ मूर्ती मार्गावर मोर्चेकरांना रोखले. मोर्चेकरांनी पोलिसांना विरोध केल्यावर पोलिसांनी अनेकांना कह्यात घेतले.

संपादकीय भूमिका

देशभरातील काही मुठभर हिंदू आणि शीख यांनी रस्त्यावर उतरून निषेध केला, अन्य हिंदूंचे काय ?