‘एक्सेल’ आस्थापनावर दूषित पाणी नाल्यात सोडण्याचा गंभीर आरोप !

स्थानिकांकडून कारवाईची मागणी

प्रतिकात्मक चित्र

रायगड – धाटाव औद्योगिक क्षेत्र रोहा येथील ‘एक्सेल’ आस्थापनावर दूषित पाणी नाल्यात सोडल्याचा गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थ राजेश डापे यांनी केला आहे. त्यांनी या घटनेचा व्हिडिओ सिद्ध करून सामाजिक माध्यमावर ‘पोस्ट’ केला. त्यामध्ये दिसत आहे की, आस्थापनाच्या परिसरातून नाल्यात काळे आणि फेस असलेले पाणी सोडले जात आहे. यामुळे आसपासचे नाले आणि नदी येथे हे पाणी मिसळले जात आहे. राजेश डापे यांचे म्हणणे आहे की, हे पाणी मूक प्राणी-पक्ष्यांनी प्यायल्यास त्यांच्या आरोग्यावर परिणाम होईल, तसेच या घटनेचा पर्यावरणावरही परिणाम होऊ शकतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यावर कारवाई करण्यास अपयशी ठरले आहे. ‘प्रशासनाने यावर कारवाई करावी’, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी राजेश डापे यांनी व्यक्त केली आहे.

संपादकीय भूमिका :

  • ‘श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे पाणी दूषित होते’, असे म्हणणारी कथित पर्यावरणवादी मंडळी आता गप्प का ?
  • जनतेला मागणी करण्याची वेळ का येते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?