अल्पवयीन मुलाकडून आईच्या गळ्यावर चाकूने वार !

घरगुती वादातून अल्पवयीन मुलाने त्याच्या आईच्या गळ्यावर चाकूने वार केले. हा प्रकार चुनाभट्टी परिसरात घडला आहे. घायाळ झालेल्या महिलेला रुग्णालयात उपाचारासाठी भरती करण्यात आले आहे.

‘व्होट जिहाद’ विरुद्ध मतांचे धर्मयुद्ध पुकारण्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन !

व्होट जिहादमुळे लोकसभेत १० मतदारसंघांमध्ये भाजपचा पराभव झाला. त्यामुळे ते ‘व्होट जिहाद’ करत असतील, तर मतांचे धर्मयुद्ध करण्यासाठी संभाजीनगरने सिद्ध राहिले पाहिजे.

लाडकी बहीण योजना आणि वृद्धांना निवृत्ती वेतन यांची रक्कम २ सहस्र १०० रुपये करणार !

या प्रसंगी अमित शहा यांनी ‘मी महाराष्ट्रातील जनतेला महायुती सरकारला सलग तिसर्‍यांदा जनादेश द्यावा’, अशी विनंती राज्यातील जनतेला केली.

‘राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगा’चे अधिवक्ता धर्मपाल मेश्राम यांची चेतावणी

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोग राज्यातील दलित, आदिवासींपर्यंत शासनाच्या योजना पोचवणे, तसेच त्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी कार्य करते.

प्रवाशांच्या हरवलेल्या आणि विसरलेल्या मौल्यवान वस्तू परत केल्या !

मध्य रेल्वेच्या कर्तव्यावर असणार्‍या कर्मचार्‍यांनी प्रवाशांच्या हरवलेल्या आणि विसरलेल्या मौल्यवान वस्तू त्यांना परत केल्या आहेत. यासाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेचे आभार मानत कौतुक केले.

वक्फ कायद्यातील ४४ सुधारणा म्हणजे भूमी जिहादला विरोधच होय ! – अधिवक्ता मिहीर प्रभुदेसाई

‘वक्फ कायद्या’त आजपर्यंत ४४ सुधारणा करण्यात आल्या आहेत. याचा आधार घेऊन लाखो एकर भूमी बळकावण्यासाठीच (भूमी जिहाद) केला जात आहे, असे प्रतिपादन अधिवक्ता मिहीर प्रभुदेसाई यांनी केले.

डोंबिवली हे मिनी हिंदु राष्ट्र; रविंद्र चव्हाण यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणा ! – सुनील देवधर, ज्येष्ठ नेते, भाजप

हा जनसंघाचा बालेकिल्ला असून ती परंपरा आणि संस्कृती टिकवण्यासाठी आपल्या सगळ्यांना १०० टक्के मतदान करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायला हवे. असे मत भाजपचे माजी केंद्रीय चिटणीस, ज्येष्ठ नेते सुनील देवधर यांनी व्यक्त केले.

कीर्तनाचा प्रसार होण्यासाठी आधुनिक सामाजिक माध्यमांचा वापर होणे आवश्यक !

गोमंतक संत मंडळ संचालित फोंडा कीर्तन विद्यालयाच्या वतीने ३४ वे निवासी कीर्तन प्रशिक्षण शिबिर म्हार्दाेळ येथील श्री महालसा संस्थानच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये ९ नोव्हेंबर या दिवशी ‘कीर्तनातून समाज प्रबोधन’ या विषयावर परिसंवाद झाला.

गोव्यातील महिलांची आखातामध्ये नोकरीच्या आमिषाने तस्करी !

गोव्यातील महिलांची आखाती देशांमध्ये नोकरीचे आमीष दाखवून तस्करी केली जात आहे. महिलांना आखातामध्ये गेल्यानंतर त्यांना सहजतेने परत यायला मिळू नये, यासाठी त्यांचे ‘व्हिसा’, पारपत्र आदी अधिकृत कागदपत्रे कह्यात घेऊन त्यांना ‘बाँडेड लेबर’ म्हणून घरकाम करण्यास लावले जात आहे.