कोल्हापूर – मिरजकर तिकटी येथे हिंदु एकता आंदोलनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार श्री. राजेश क्षीरसागर आणि भाजपचे उमेदवार माजी आमदार श्री. अमल महाडिक यांना हिंदुत्वाच्या सूत्रावर पाठिंबा घोषित करण्यात आला आणि त्यांना तसे पत्र देण्यात आले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, ‘भ्रष्टाचार विरोधी जनजागृती कृती समिती’चे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, सर्वश्री वैभव कवडे, गणेश नारायणकर, अनिकेत पवार, संदीप सासने यांसह अन्य उपस्थित होते.