सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६६ ग्रामपंचायतींसाठी ७० टक्के मतदान : मतदान शांततेत !

जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला झालेले मतदान शांततेत पार पडले. मतदानानंतर १ सहस्र ८७ गावकारभार्‍यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून १८ जानेवारीला होणार्‍या मतमोजणीकडेे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मकरसंक्रांतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली मान्यवर अधिवक्त्यांची भेट !

मकरसंक्रतीच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाचे पू. अधिवक्ता हरिशंकर जैन, अधिवक्ता आर्. वेंकटरमणी आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांची समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सदिच्छा भेट घेतली.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केली केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या आरोग्याची चौकशी

रस्ता अपघातानंतर केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर ‘गोमेकॉ’त उपचार चालू आहेत. या वेळी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी उपराष्ट्रपती एम्. व्यंकय्या नायडू यांना त्यांचे आरोग्य सुधारत असल्याचे सांगितले.

प्रशासनाकडून योग्य मोबदला न मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न करणारे अरुणा प्रकल्पग्रस्त शांताराम नागप यांचे उपचारांच्या वेळी निधन

मागण्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा प्रविष्ट करा ! – तानाजी कांबळे

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या दिवशी ७ केंद्रांमध्ये ७०० आरोग्य कर्मचार्‍यांना लस देणार

‘‘२ खासगी आणि ५ सरकारी रुग्णालये मिळून एकूण ७ केंद्रांमध्ये कोरोना लसीकरण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.प्रत्येक केंद्रामध्ये प्रत्येकी १०० आरोग्य कर्मचार्‍यांना लस दिली जाणार आहे.” अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

बंगालमध्ये दंगल घडवणारा भाजपसारखा घातक विषाणू पसरत आहे ! – तृणमूलच्या खासदार नुसरत जहां यांची टीका

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात प्रतिदिन हिंदूंवर धर्मांधांकडून अत्याचार होत आहेत, बॉम्बस्फोट घडवले जात आहेत, गोहत्या केली जात आहे, हे पहाता तृणमूल काँग्रेस कोणत्या प्रकारचा विषाणू आहे, हे नुसरत जहां सांगतील का ?

आज पणजी येथे ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

राजधानी पणजी येथे १६ जानेवारीपासून चालू होणार्‍या ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (‘आंचिम’चे) कन्नड चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि गायक सुदीप संजीव आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे.

जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने १८ जानेवारीपासून रस्ता सुरक्षा अभियान

वाहनचालकांसह नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, वाहतूक नियमांविषयी जनजागृती व्हावी, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे.

जागतिक आरोग्य घटनेकडून पुन्हा भारताचे चुकीचे मानचित्र (नकाशा) प्रसारित

जागतिक आरोग्य संघटनेला शब्दांची भाषा समजत नसेल, तर भारताने तिला देण्यात येणारी वार्षिक देणगी बंद केली पाहिजे !

आमरण उपोषण करणार्‍या खाण कामगारांपैकी दोघांची प्रकृती ढासळली : जिल्हा रुग्णालयात भरती

मागील ११ मासांचे थकीत वेतन मिळण्यासाठी फोंडाघाट येथील चिराग माइन्स आस्थापनाच्या कामगारांचे मागील ४ दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू आहे.