बंगालमध्ये दंगल घडवणारा भाजपसारखा घातक विषाणू पसरत आहे ! – तृणमूलच्या खासदार नुसरत जहां यांची टीका

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात प्रतिदिन हिंदूंवर धर्मांधांकडून अत्याचार होत आहेत, बॉम्बस्फोट घडवले जात आहेत, गोहत्या केली जात आहे, बांगलादेशातून घुसखोरी होत आहे, हे पहाता तृणमूल काँग्रेस कोणत्या प्रकारचा विषाणू आहे, हे नुसरत जहां सांगतील का ?

कोलकाता (बंगाल) – तुम्ही डोळे उघडे ठेवा. भाजपसारखा घातक विषाणू पसरत आहे. हा पक्षांमध्ये भेदभाव आणि व्यक्ती व्यक्तींमध्ये दंगल घडवत आहे. जर भाजप सत्तेत आला, तर मुसलमानांची उलट गणना (काऊंटडाऊन) चालू होईल, असे विधान तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहां यांनी उत्तर २४ परगणामधील मुसलमानबहुल देगंगा भागात प्रचार करतांना केले. (नुसरत जहां यांनी हिंदु तरुणाशी विवाह केला आहे आणि त्या हिंदु पद्धतीने आचरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते, तरी असे विधान करून नुसरत जहां यांनी त्यांची खरी मानसिकता दाखवून दिली आहे ! – संपादक)

 (सौजन्य : Times Now)