सर्व गोष्टींसाठी जनतेला उपोषण, आंदोलन आदी करावे लागणे, हे प्रशासनाचे अपयश !
सिंधुदुर्ग – मागील ११ मासांचे थकीत वेतन मिळण्यासाठी फोंडाघाट येथील चिराग माइन्स आस्थापनाच्या कामगारांचे मागील ४ दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू आहे. यातील संजय तेली आणि रामचंद्र धुरी या कामगारांची प्रकृती अत्यंत खालावल्याने त्यांना उपचारांसाठी तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आस्थापनाकडे वारंवार मागणी करूनही त्यावर उचित कार्यवाही झाली नाही. याविषयी ७ जानेवारीला जिल्हा सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे सुनावणी झाली. त्या वेळी ‘११ जानेवारी पूर्वी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल’, असे सांगितले गेले; मात्र आजपर्यंत वेतन मिळालेले नाही. त्यामुळे कामगारांनी आमरण उपोषण चौथ्या दिवशीही चालू ठेवले. याची दखल घेत आमदार नितेश राणे यांनी १४ जानेवारी दिवशी कामगारांची भेट घेऊन याविषयी संबंधित आस्थापनाशी चर्चा करून आपले थकित वेतन मिळवून देण्याची निश्चिती दिली आहे.