श्री भवानीदेवीच्‍या अलंकारांची पडताळणी करण्‍याचे जिल्‍हाधिकार्‍यांचे आदेश !

श्री तुळजाभवानीदेवीच्‍या अलंकारांमध्‍येच अपहार होत असेल, तर मंदिराच्‍या कारभारात किती गलथानपणा असेल ?’, याचा अंदाज यावरून येतो. त्‍यामुळे मंदिरे ही सरकारीकरणातून मुक्‍त करून भक्‍तांच्‍याच कह्यात द्यायला हवीत !

कोल्‍हापूर येथील हिंदूंना जामीन !

कोल्‍हापूर येथे जागृत झालेल्‍या हिंदूंचा आदर्श सर्वत्रच्‍या हिंदूंनी घेतल्‍यास हिंदु राष्‍ट्र दूर नाही !

खालापूर (रायगड) येथे इरशाळवाडी गावात दरड कोसळून १२ जणांचा मृत्यू !

मोरबे धरणाच्या परिसरात वरील बाजूस इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इरशाळवाडी या गावात रात्री ११.३० ते १२ वाजण्याच्या दरम्यान डोंगरावरून भली मोठी दरड खाली कोसळली. या दुर्घटनेत ३० ते ४० घरे नागरिकांसह गाडली गेली.

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यातील दुर्घटनेच्या चौकशीच्या विलंबावरून विरोधक आक्रमक !

‘‘कार्यक्रमाच्या ठिकाणी व्यवस्था उत्तम प्रकारे ठेवण्यात आली होती. उष्णतामान वाढल्याने हा प्रकार घडला. ‘विरोधीपक्ष यामध्ये अतिशय घाणेरडे आणि क्षुद्र राजकारण करत आहेत.’’ – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपून ‘लँड जिहाद’ करणारा ‘वक्फ कायदा’ रद्द करा !  – हिंदु जनजागृती समितीचे आजरा आणि चंदगड येथे निवेदन

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी ‘लँड जिहाद’द्वारे हडपणारा ‘वक्फ’चा काळा कायदा रद्द करण्यात यावा, अशा मागणीचे केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री यांच्या नावे असलेले निवेदन आजरा अन् चंदगड येथे हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने देण्यात आले.

दुर्गम भागामुळे बचाव पथकाचे काम अधिक वेळ चालेल ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुर्घटनेत २५ ते २८ जण बाधित झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ७० नागरिक सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. २१ जण घायाळ असून त्यांतील १७ जणांवर स्थानिक ठिकाणी उपचार चालू आहेत, तर ६ जणांना पनवेल येथील महात्मा गांधी रुग्णालयात उपचार चालू आहे. आतापर्यंत १० लोकांचे मृतदेह प्राप्त झाले आहेत.

दीप अमावास्येच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने दीपपूजन !

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने शिवतीर्थ, मारुति चौक येथे दीप अमावास्येच्या निमित्ताने दीपपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

#Exclusive : वारंवार दुर्घटना घडूनही कोकणात ‘एन्.डी.आर्.एफ्.’ला मान्यता नाही !

कोकणात ‘आपत्ती प्रतिसाद दल’ कधी स्थापन होणार ?

राज्‍यातून बेपत्ता होणार्‍या मुलींविषयी विधीमंडळात चर्चा करणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी महाराष्‍ट्रातून दिवसाला सरासरी ७० युवती बेपत्ता होतात तसेच पुणे येथून २ सहस्र ८५८ मुली बेपत्ता असल्‍याची माहिती सभागृहात दिली.

ए.पी.एम्.सी. वाहतूक पोलिसांकडून १६ लाख ८८ सहस्र रुपये थकीत ‘ई-चलन’च्‍या दंडाची वसुली !

नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्‍त तिरुपती काकडे यांनी ई-चलनच्‍या थकबाकीची वसुली करण्‍यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्‍यानुसार ही कार्यवाही चालू आहे.