दीप अमावास्येच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने दीपपूजन !

दीपपूजनाच्या प्रसंगी उपस्थित विविध मान्यवर

सांगली – श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने शिवतीर्थ, मारुति चौक येथे दीप अमावास्येच्या निमित्ताने दीपपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी पू. गुरुनाथ कोटणीस महाराज, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका उपायुक्त राहुल रोकडे, चंद्रयान-३ मधील ‘जी.एस्.एल्.व्ही.’ रॉकेटमधील महत्त्वाच्या भागांना कोटींग देणारे श्री. संदीप सोले यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी श्री गणेशपूजन, दीपपूजन, दीपस्तंभपूजन, ध्वजपूजन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. शेवटी आरती करण्यात आली.

गणपति मंदिर परिसरात लावण्यात आलेले प्रबोधनपर होर्डिंग
मारुति मंदिर चौक परिसरात लावण्यात आलेले प्रबोधनपर होर्डिंग

या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक श्री. नितीन चौगुले म्हणाले, ‘‘गतहारी अमावास्या म्हणजे दीप अमावास्येच्या संदर्भातील जनजागृती मोहीम आम्ही गतवर्षीपासून करत आहोत. यात होर्डिंग, फलक, सामाजिक माध्यम यांचा वापर केला जात आहे. या माध्यमातून दीप अमावास्येचे महत्त्व आम्ही हिंदूंना समजावून देत आहोत, तसेच सणांचे होणारे विडंबन टाळण्यासाठी प्रयत्नशील आहोत.’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विजय कडणे यांनी केले. या वेळी सर्वश्री आनंदराव चव्हाण, देवा गायकवाड, दिगंबर साळुंखे, प्रदीप पाटील, मोहन शिंदे, कौशिक बेलवलकर,अक्षय पाटील, जयदीप सदामते, पृथ्वीराज पाटील यांसह अन्य उपस्थित होते.