
मुंबई, १९ जुलै (वार्ता.) – राज्यात बेपत्ता होणार्या मुलींचा प्रश्न गंभीर आहे. एक मुलगी बेपत्ता होत असली, तरी ते योग्य नाही. संपूर्ण देशाच्या दृष्टीने हा प्रश्न गंभीर आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत मुली बेपत्ता होण्याचा महाराष्ट्राचा क्रमांक कितवा ? हे सांगणे योग्य नाही. ‘विधीमंडळात कायदा आणि सुव्यवस्था यांवरील चर्चेच्या वेळी यावर सविस्तर चर्चा करू’, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी महाराष्ट्रातून दिवसाला सरासरी ७० युवती बेपत्ता होतात तसेच पुणे येथून २ सहस्र ८५८ मुली बेपत्ता असल्याची माहिती सभागृहात दिली. याविषयी १८ जुलै या दिवशी स्थगन प्रस्ताव आणून चर्चा करण्याची मागणी अनिल देशमुख यांनी केली. या वेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्ताव नाकारला; मात्र या गंभीर प्रश्नाची सरकारने नोंद घेण्याचे निर्देश दिले.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !