धनंजय मुंडे आणि त्या महिलेचा वाद मध्यस्थांच्या वतीने मिटवण्यात येणार

मुंडे आणि महिला यांच्या वतीने न्यायमूर्ती ए.के. मेनन यांच्यासमोर परस्पर सहमतीची सूत्रे सादर करण्यात आली.

वेंगुर्ला येथील नगरवाचनालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

साहित्यिक, व्यासंगी वाचक पुरस्कार, विविध स्पर्धांचे आयोजन करून प्रत्यक्ष वाचन चळवळ बळकट करत आहेत, असे प्रतिपादन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त वीरधवल परब यांनी ग्रंथप्रदर्शनाच्या शुभारंभी केले.

कर्नाटकचा राजकीय दहशतवाद संपवावाच लागेल ! – शिवसेना

बेळगावसह सीमा भागातून मराठी भाषा, संस्कृतीच्या खुणा उखडून टाकण्याचा चंग कानडी सरकारने बांधला आहे. हा राजकीय आणि सांस्कृतिक दहशतवाद आहे. तो संपवावाच लागेल, अशी भूमिका शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून मांडली आहे.

१ ते ९ मार्च कालावधीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या १ ते ९ मार्च या कालावधीत अयोध्येचा दौरा करणार आहेत. २९ जानेवारी या दिवशी मनसेची आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या सिद्धतेचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली.

एकदा जर उद्रेक झाला, तर थांबवणार कोण ?

मराठा आरक्षण प्रश्‍नी उदयनराजेंची चेतावणी

कचरावेचक महिलांना विनामूल्य चारचाकी प्रशिक्षण देणार ! – गीतांजली ढोपे-पाटील, सभापती, महिला आणि बालकल्याण

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात महिला स्वच्छतागृहे बांधण्याचा आमचा मनोदय आहे, अशी माहिती महिला आणि बालकल्याण सभापती सौ. गीतांजली ढोपे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर-मिरज मार्गाचे दुहेरीकरण करा ! – संजय मंडलिक, खासदार, शिवसेना

मिरज-पुणे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण चालू आहे ,त्यामुळे कोल्हापूर मिरज मार्गाचे दुहेरीकरण आवश्यक आहे.

राममंदिर निर्माणासाठी पंकजा मुंडे यांनी दिला पाच लाख रुपये निधी 

प्रभु श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ५ लाख रुपयांचा निधी समर्पित केला आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आरोग्य दिनदर्शिका अत्यंत मोलाची ! – डॉ. अनिल माळी, जिल्हा शल्यचिकित्सक

दिनदर्शिकेच्या विक्रीतून मिळणारी रक्कम ही अंध विद्यार्थ्यांना बोलणारी घड्याळे देण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या अंबरनाथ तालुक्यातील धारकार्‍यांच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाचे अंबरनाथ तालुक्यातील सर्व धारकरी बंधू आणि भगिनी यांनी पूजन करून वंदन केले.