सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आरोग्य दिनदर्शिका अत्यंत मोलाची ! – डॉ. अनिल माळी, जिल्हा शल्यचिकित्सक

शायरन फीचर्स-पी.आर.-हेल्थ इव्हेंटर २०२१ या दिनदर्शिकेचे प्रकाशन करतांना श्री. राजेंद्र मकोटे (डावीकडून चौथे) यांसह मान्यवर

कोल्हापूर, २९ जानेवारी – कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय, स्वयंसेवी संस्थांची आरोग्य विश्‍वाचे प्रतिबिंब असणारी आरोग्य दिनदर्शिका ही सामाजिक – वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येकाला अत्यंत मोलाची अशीच आहे. भविष्यात त्याची व्याप्ती वाढवावी, असे मत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांनी व्यक्त केले. डॉ. माळी यांच्या हस्ते सलग ९ व्या वर्षी निघालेल्या शायरन फीचर्स-पी.आर.-हेल्थ इव्हेंटर २०२१चे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. हा प्रकाशन समारंभ छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या परिसरात पार पडला.

प्रारंभी सर्वांचे स्वागत करतांना दिनदर्शिकेचे संपादक समन्वयक श्री. राजेंद्र मकोटे म्हणाले, या दिनदर्शिकेत रुग्णालये, रक्तपेढी, रुग्णसेवेतील स्वयंसेवी संस्था, यांसह अनेक सामाजिक संस्थांचे क्रमांक आहेत. सदर दिनदर्शिकेच्या विक्रीतून मिळणारी रक्कम ही अंध विद्यार्थ्यांना बोलणारी घड्याळे देण्यासाठी वापरण्यात येणार आहे. आभार प्रदर्शन श्री. अमोल कुरणे यांनी केले.