गेली ७२ वर्षे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणारे गाव ‘बेल्लद बागेवाडी’

बिनविरोध निवडणुकीमुळे गावाच्या विकासाला गती मिळणार आहे.

कलबुर्गी (कर्नाटक) येथील प्रशासकीय अधिकारी यशवंतराव सूर्यवंशी यांचा ‘विश्‍व रत्न पुरस्कार’ देऊन गौरव

बसला एका मोठ्या अपघातातून वाचवणार्‍या श्री. यशवंतराव सूर्यवंशी यांना पेशवा विश्‍व माता फाऊंडेशनच्या वतीने नुकताच विश्‍व रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

कर्नाटक येथील आयफोन बनवणार्‍या आस्थापनाच्या तोडफोडीच्या मागे साम्यवादी संघटनेचा हात !

आयफोन आणि चिनी भ्रमणभाष आस्थापने यांच्यात स्पर्धा असल्याने चीनला साहाय्य व्हावे म्हणून साम्यवाद्यांनी ही तोडफोड केली नाही ना ?, याचीही चौकशी झाली पाहिजे !

कर्नाटकातील ६ वीच्या विज्ञानाच्या पुस्तकातील ब्राह्मणांच्या भावना दुखावणारा धडा भाजप सरकार हटवणार

७ वीच्या पुस्तकातून टिपू सुलतानवरील धडा हटवण्यात आला होता.

कर्नाटकमध्ये हनुमान मंदिरासाठी बाशा नावाच्या मुसलमान व्यक्तीने दिली दीड गुंठे भूमी दान !

प्रसारमाध्यमांनी या वृत्ताला ठळक प्रसिद्धी दिली; मात्र जेव्हा धर्मांध हे हिंदूंच्या मंदिरांवर, धार्मिक मिरवणुकांवर आक्रमण करतात, तेव्हा अशी वृत्ते दडपली जातात, हे लक्षात घ्या ! बाशा यांच्यासारखे हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत.

अन्य धर्मियांनी मंदिरात प्रवेश केल्यावर आभाळ कोसळणार आहे का ? – कर्नाटक उच्च न्यायालयाचा प्रश्‍न

याचिका फेटाळताना न्यायालयाने म्हटले की, देशात राज्यघटना नावाची गोष्ट अस्तित्वात आहे. आम्ही अशा याचिकेवर विचार करू शकत नाही जी आम्हाला १०० वर्षे मागे नेईल.

तुमकुरू (कर्नाटक) येथील श्री महालक्ष्मी मद्दरलक्कम्मादेवीचे मंगळुरू येथील आश्रमात शुभागमन

देवीने सोबत आलेल्या भक्तांच्या माध्यमातून ‘सनातनचे कार्य उत्तरोत्तर वाढू दे’, असा आशीर्वाद दिला, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याची प्रशंसा केली. भक्तांनी सांगितले की, सनातनचे कार्य अद्भुत आहे. आम्हीही तुमच्या कार्याला हातभर लावू.

गोहत्याबंदी कायद्यावरून कर्नाटकच्या विधान परिषदेत हाणामारी

गोहत्याबंदीचा विरोध करण्यासाठी विधान परिषदेत हाणामारी करणार्‍या धर्मांधप्रेमी काँग्रेसचे हे वास्तव हिंदूनी ओळखल्याने देशात तिचा सर्वत्र पराभव होत आहे. तरीही काँग्रेसला अद्याप शहाणपण आलेले नाही !

अमली पदार्थांच्या प्रकरणी जामिनावर असलेल्या कन्नड अभिनेत्री संजल गुलरानी यांचे बलपूर्वक धर्मांतर

एवढेच नव्हे, तर त्यांचे ‘महिरा’ असे नामकरणही करण्यात आले आहे. त्याला पुरावा म्हणून नामकरण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे…

धर्मप्रेमी युवकांकडून झाडाखाली ठेवलेल्या हिंदु देवतांच्या प्रतिमांचे विधीवत् विसर्जन !

रिसालदार गल्ली येथील खडेबाजार पोलीस स्थानकासमोरील वडाच्या झाडाखाली हिंदु देवतांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. याचे वृत्त एका दैनिकात प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची नोंद घेऊन काही धर्मप्रेमी हिंदू युवकांनी एकत्रित येऊन या सर्व प्रतिमा संकलित केल्या.