देशात बाशा यांच्यासारखे किती जण हिंदूंच्या मंदिराला दान करतात ?
प्रसारमाध्यमांनी या वृत्ताला ठळक प्रसिद्धी दिली; मात्र जेव्हा धर्मांध हे हिंदूंच्या मंदिरांवर, धार्मिक मिरवणुकांवर आक्रमण करतात, तेव्हा अशी वृत्ते दडपली जातात, हे लक्षात घ्या ! बाशा यांच्यासारखे हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत. त्यामुळे अशा १-२ उदाहरणांवरून पूर्ण समुदायाला ‘सर्वधर्मसमभाव मानणारे’, असे सांगणे हास्यास्पद ठरेल !
बेंगळुरू (कर्नाटक) – होसाकोटे तालुक्यातील एच्.एम्.जी. बाशा या मुसलमान व्यापार्याने त्याच्या भूमीच्या शेजारी असलेल्या हनुमान मंदिरासाठी दीड गुंठे भूमी दान केली आहे. या भूमीची बाजारभावानुसार ८० ते १ कोटी रुपये मूल्य आहे. त्यांच्या या दानावरून चर्चा होत आहे.
१. बाशा यांच्या कुटुंबाची ३ एकर भूमी आहे. या भूमीचा काही भाग हा वेलागेलेपुरा येथील एका छोट्या हनुमान मंदिराला लागून आहे. मागील ३० वर्षांपासून हे हनुमान मंदिर येथील हिंदूंसाठी एक महत्त्वाचे प्रार्थनास्थळ म्हणून ओळखले जाते; मात्र ‘या मंदिरामध्ये पूजा करून झाल्यावर प्रदक्षिणा घालतांना पुरेशी जागा नसल्याने भक्तांना अडचण निर्माण होते’, हे बाशा यांच्या लक्षात आले. याच कालावधीमध्ये गावकर्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांना भूमी अल्प पडत असल्याचे बाशा यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दीड गुंठे भूमी दिली.
२. बाशा म्हणाले की, माझ्या संपूर्ण कुटुंबाने माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला. आज आपण सर्वजण जिवंत आहोत. उद्या नसू. आपल्या आयुष्यात अनिश्चितता कायम आहे. असे असतांनाच एकमेकांविषयी द्वेष परसवून आपल्याला काय मिळणार आहे ? आपल्या हातून समाजहिताचे काम घडावे, यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. मीही तसाच प्रयत्न केला आहे.