कर्नाटक येथील आयफोन बनवणार्‍या आस्थापनाच्या तोडफोडीच्या मागे साम्यवादी संघटनेचा हात !

स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या स्थानिक अध्यक्षाला अटक

आयफोन आणि चिनी भ्रमणभाष आस्थापने यांच्यात स्पर्धा असल्याने चीनला साहाय्य व्हावे म्हणून साम्यवाद्यांनी ही तोडफोड केली नाही ना ?, याचीही चौकशी झाली पाहिजे !

कॉम्रेड श्रीकांत

बेंगळुरू (कर्नाटक) – भारतात ‘अ‍ॅपल’चे आयफोन बनवणारे आस्थापन ‘विस्ट्रॉन कॉर्पोरेशन’च्या कारखान्यावर १२ डिसेंबर या दिवशी आस्थापनाच्या कर्मचार्‍यांनी वेतन कपातीचा विरोध म्हणून मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती. यामुळे या आस्थापनाची ४३७ कोटी ४० लाख रुपयांची हानी झाल्याचे आस्थापनाने म्हटले आहे.

या प्रकरणी साम्यवादी विद्यार्थ्यांची संघटना The hand of the communist organization behind the demolition of the iPhone manufacturing establishment in Karnataka ! चा स्थानिक अध्यक्ष कॉम्रेड  श्रीकांत याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, श्रीकांत यानेच आस्थापनाच्या विरोधातील व्हॉट्सअ‍ॅप संदेश लिहून सर्वत्र प्रसारित केल्याने हिंसाचार घडला.