भारत देश अगोदरपासूनच हिंदु राष्ट्र आहे ! – विष्णु कोकजे, माजी न्यायमूर्ती

केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून हिंदु राष्ट्र होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे आरोप होतात; मात्र देशाला हिंदु राष्ट्र करण्याची वेगळी आवश्यकताच नाही. देश अगोदरपासूनच हिंदु राष्ट्र आहे, असे मत विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी न्यायमूर्ती विष्णू कोकजे यांनी व्यक्त केले.

झारखंडच्या काही जिल्ह्यांत आदिवासी तरुणींशी मोठ्या प्रमाणात मुसलमान तरुण विवाह करत आहेत ! – विहिंप

येथे सरकारने २६ एप्रिलला आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात आदिवासी तरुणीचा मुसलमान तरुणाशी विवाह करण्यात आला. या घटनेचा हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध केला आहे. विश्‍व हिंदु परिषदेनेही यावर टीका केली आहे.

राममंदिराचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल ! – विहिंपचे अध्यक्ष विष्णु कोकजे

येथील राम जन्मभूमीवर भव्य राममंदिराच्या निर्माणाचे स्वप्न अशोक सिंघल आणि अन्य लोकांनी पाहिले होते. त्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

अयोध्येत राममंदिर होत असतांना नवीन मशीद बांधू देणार नाही ! – विहिंप

योध्येत राममंदिर निर्माणाची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. ही निश्‍चितच आनंदाची गोष्ट आहे; मात्र त्याच वेळी हे ही निश्‍चित आहे की, अयोध्येच्या सांस्कृतिक सीमेच्या आत कोणतीही नवीन मशीद बांधू देणार नाही, अशा शब्दांत विश्‍व हिंदु परिषदेने चेतावणी दिली आहे.

अयोध्येमध्ये राममंदिर होणारच ! – आलोक कुमार, नूतन कार्याध्यक्ष, विहिंप

अयोध्येत राममंदिर व्हावे, अशी कोणा एकाची इच्छा नाही, तर कोट्यवधी हिंदूंची इच्छा आहे. त्यांचेच प्रतिनिधित्व विश्‍व हिंदु परिषद करत आहे. त्यामुळे अयोध्येत राममंदिर निर्माण होणारच….

भाजपने मतांसाठी हिंदु आणि भगवान श्रीराम यांचा वापर केला ! – डॉ. प्रवीण तोगाडिया

भाजपने मते मिळवण्यासाठी हिंदु आणि भगवान श्रीराम यांचा वापर केला, असा आरोप विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी केला आहे. ‘विकास आणि सुरक्षा यांत अयशस्वी ठरलेला भाजप पुन्हा हिंदूंच्या मतांसाठी राममंदिराचे आंदोलन चालू करून हिंदूंना मरण्यासाठी वार्‍यावर सोडेल’

बंगालमधील राणीगंज येथील श्रीरामनवमीच्या शोभायात्रेवर धर्मांधांचे आक्रमण

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी श्रीरामनवमीच्या निमित्ताने २६ मार्च या दिवशी  राणीगंज येथे शोभायात्रेचे आयोजन केले होते. त्यावर धर्मांधांनी आक्रमण केले.

तमिळनाडूमध्ये विहिपच्या ‘रामराज्य रथयात्रे’ला द्रमुक पक्षाचा विरोध

विश्‍व हिंदु परिषदेच्या देशव्यापी ‘रामराज्य रथयात्रेमुळे राज्यातील धार्मिक वातावरण बिघडेल आणि शांततेला धोका निर्माण होईल’, असे सांगत तमिळनाडूमधील मुख्य विरोधी पक्ष द्रमुकने यात्रेला थांबवण्याची मागणी केली आहे.

समाज उभारणीकरीता धर्मस्थाने टिकली पाहिजेत – बाबूजी नाटेकर, विश्‍व हिंदू परिषद

समाज संपन्न करण्यासाठी आपली धर्मस्थाने बळकट व्हायला हवीत; कारण धर्मस्थाने आणि मंदिरे ही आपली अस्मिता आहे. ती जागृतीचे स्थान आहेत. मंदिर हे संस्कारांचे केंद्र झाले, तरच आपल्यावरील वैचारिक अतिक्रमण थांबू शकेल.

अफझलखान वधाचा फलक लावणे गुन्हा असेल, तर पोलिसांनी तसे लेखी द्यावे ! – श्री. केतन रघुवंशी, कार्यकर्ता, विश्‍व हिंदू परिषद

येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण यांनी ५ मार्च या दिवशी ‘अफझलखान वधाचा फलक लावल्या’च्या कारणावरून श्री. केतन रघुवंशी यांना कलम ३५३ अन्वये अटक केली होती.


Multi Language |Offline reading | PDF