हिंदूंच्या शक्तीप्रदर्शनानंतर मुंबईतील मुसलमानांची मुजोरी बंद !

हिंदूबहुल भागात डी.जे. लावून काढण्यात येणार्‍या मिरवणुका थांबवल्या !

डोंगरी येथील रेहमानशाह दर्गा

मुंबई, २६ नोव्हेंबर (वार्ता.) – हिंदूंच्या शक्तीप्रदर्शनानंतर भेंडीबाजार परिसरात उरुसाच्या नावाखाली कर्णकर्कश आवाजात डी.जे. वाजवून काढण्यात येणार्‍या मिरवणुका २ दिवसांपासून मुसलमानांनी थांबवल्या आहेत. या प्रकरणी साहिल कुरेशी याच्या विरोधात जे.जे. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

डोंगरी येथील रेहमानशाह बाबाच्या दर्ग्यामधील ऊरुसाच्या नावाखाली काही दिवसांपासून मुसलमानांकडून या परिसरामध्ये विनाअनुमती मिरवणुका काढत होते. मिरवणुकीमध्ये रात्री उशिरापर्यंत कर्णकर्कश आवाजात डी.जे. लावला जात होता. या विरोधात अनेक स्थानिक हिंदूंनी जे.जे. पोलीस ठाणे आणि वल्लभभाई पटेल पोलीस ठाणे येथील पोलिसांकडे तक्रार करूनही या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती. त्यामुळे या भागातील संतप्त हिंदू २४ नोव्हेंबरला शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले. हिंदूंच्या शक्तीप्रदर्शनानंतर ‘हिंदूबहुल भागातून उरुसाची मिरवणूक काढू देणार नाही’, तसेच ‘मिरवणुकीत डी.जे. वाजवू देणार नाही’, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले होते. हिंदूंच्या शक्तीप्रदर्शनानंतर मुसलमानांचा हा उद्दामपणा बंद झाला आहे. २५ नोव्हेंबरच्या सायंकाळी येथील श्री नागेश्वर महादेव गोल मंदिरामध्ये शेकडो हिंदूंनी एकत्र येऊन महाआरतीही केली होती.

१०० क्रमांकावर तक्रार करूनही पोलिसांनीकारवाई केली नाही ! – सुनील सावंत, माजी कार्याध्यक्ष, विश्व हिंदु परिषद

कर्णकर्कश आवाजात डी.जे. लावण्याच्या विरोधात आम्ही अनेकदा १०० क्रमांकावर तक्रार प्रविष्ट केली, तरीही पोलीस कारवाई करत नव्हते. नेहमी संपर्कात असलेल्या ओळखीच्या पोलिसांना दूरभाष केला असता, तेही दूरभाष उचलत नव्हते. केवळ हिंदूंनी शक्तीप्रदर्शन केल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे, अशी प्रतिक्रिया विश्व हिंदु परिषदेचे माजी कार्याध्यक्ष श्री. सुनील सावंत यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी व्यक्त केली.

संपादकीय भूमिका :

तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसतील, तर पोलीस प्रशासनाचा पांढरा हत्ती पोसायचा कशाला ?