संयुक्त राष्ट्रांच्या ८६ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण

संयुक्त राष्ट्रांच्या ८६ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. युरोपमध्ये असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वाधिक सदस्यांना त्याचा संसर्ग झाला आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते स्टीफन दुजारीक यांनी दिली आहे.

२१ दिवसांच्या दळणवळण बंदीसाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताचे कौतुक

कोरोनाच्या विरोधात भारताचा लढा चालू आहे, त्यामध्ये आम्ही सुद्धा भारतासमवेत एकजुटीने उभे आहोत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उचलण्यात आलेले हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आहे, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडून भारताचे कौतुक करण्यात आले आहे.