‘कोरोनाचे संकट संपेल’, असे स्वप्न जगाने पहाण्यास अडचण नाही ! – जागतिक आरोग्य संघटना

जिनीव्हा (स्वित्झर्लंड) – अनेक देशांमध्ये कोरोनाविरोधी लसींवर काम चालू आहे. काही ठिकाणी लस तिसर्‍या टप्प्यातही आहे. त्यांचे परिणाम पाहिले, तर आता आपण कोरोनाचे संकट संपेल, असे स्वप्न पहाण्यास अडचण नाही, असे मत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेंड्रोस घेब्रेयेसस यांनी व्यक्त केले आहे. ते संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत बोलत होते.

डॉ. टेंड्रोस घेब्रेयेसस पुढे म्हणाले की,

१. संकट संपेल, असे असले तरीही प्रगत आणि श्रीमंत देशांनी गरीब अन् मागास देशांना लसीच्या आशेवर ठेवू नये. त्यांना साहाय्य करावे.

२. कोरोनावरील लस आल्यावरही जगाला गरिबी, उपासमारी, असमानता यांच्याशी लढावेच लागणार आहे. त्यावर लस नाही. अनेक देशांमध्ये या मुळातल्या समस्या आहेत.