संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत श्रीलंकेच्या विरोधातील प्रस्तावावरील मतदानाच्या वेळी भारत अनुपस्थित !

पाक, बांगलादेश, अफगाणिस्तान आदी शेजारी देशांतील हिंदूंना कुणीही वाली नाही. तसेच आता श्रीलंकेतील हिंदूंचीही स्थिती होणार आहे का ? भारत सरकारने श्रीलंकेतील तमिळी हिंदूंना आश्‍वस्त करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !

कोरोना ‘हंगामी आजार’ म्हणूनच विकसित होण्याची संयुक्त राष्ट्रांची चेतावणी

चीनमध्ये कोरोना विषाणू आढळून आल्याच्या घटनेला वर्षभरापेक्षा अधिक कालावधी होऊन गेला आहे. कोरोनाची लसही आली; मात्र कोरोनाचा संसर्ग कायम आहे.

म्यानमारमध्ये चिनी आस्थापनांना आग लावल्यामुळे सैन्याने केलेल्या गोळीबारात ५१ आंदोलक ठार

आतापर्यंत या आंदोलनामध्ये १२५ हून अधिक आंदोलक ठार झाल्याचे सांगितले जात आहे. चिनी दूतावासाने या घटनेची गंभीर नोंद घेत त्यांच्या नागरिकांना सतर्कतेची चेतावणी दिली आहे.

खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख्स फॉर जस्टिस’कडून संयुक्त राष्ट्रांना ७ लाख रुपयांची देणगी !

संयुक्त राष्ट्रांनी जिहादी आतंकवादी संघटनेकडून पैसे स्वीकारणे अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आदी बलाढ्य देशांना मान्य आहे का ? या संघटनेचे खरे स्वरूप उघड झाल्यावर ही संघटनाच बरखास्त करण्याची मागणी भारताने लावून धरणे आवश्यक !

म्यानमारचा लष्करी सत्तापालट !

९० टक्के बौद्ध नागरिक असणार्‍या म्यानमारमध्ये लष्कराने सत्ता हाती घेतल्यापासूनच जनतेने तीव्र विरोध चालू केला आणि १ मास संपून आताही तो चालू आहे. लष्कराच्या हाती सत्ता आल्यावर तेथील लोक म्हणालेे, ‘‘एका रात्रीत त्यांचे आयुष्य उलटसुलट पालटून गेले.’’

धर्मच ती शक्ती आहे जी जगातील मोठ्या लोकसंख्येला ‘पर्यावरण योद्धा’ बनवू शकते ! – संयुक्त राष्ट्रे

उशिरा का होईना संयुक्त राष्ट्रांना धर्माचे महत्त्व लक्षात आले आहे. हिंदु धर्मात निसर्ग आणि पर्यावरण यांना पुष्कळ महत्त्व देण्यात आल्याने त्याच्या रक्षणाचा नेहमीच प्रयत्न केला जातो ! हिंदु धर्मानुसार आचरण केल्यासच खर्‍या अर्थाने पर्यावरणाचे रक्षण होईल !

म्यानमारमधील सत्तापालट !

भारतही स्वतः बलशाली झाल्यास हाती अनेक पर्याय उपलब्ध असतात आणि व्यापक विचार करून  त्यानुसार कृती करणे शक्य होते. म्यानमारमधील सत्तापालटातून भारताने बलशाली होणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

भारत आणि पाक यांच्यात सैनिकी संघर्ष झाल्यास संपूर्ण जगासाठी विनाशकारी  ! – संयुक्त राष्ट्रे

असा संघर्ष झाल्याविना भारताला आणि जगाला शांतता लाभणार नाही, हीसुद्धा वस्तूस्थिती आहे !

जगातील ५८ सहस्र ७०० मोठ्या धरणांपैकी बहुतेक धरणांचे आयुष्य संपत अल्याने जगाला धोका ! – संयुक्त राष्ट्रे

संयुक्त राष्ट्रांच्या कॅनडामधील ‘जल, पर्यावरण आणि आरोग्य संस्थे’च्या ‘कालबाह्य होत असलेले जलसाठे : नवा धोका’ या अहवालानुसार यातील अनेक धरणांचे आयुष्यमान कधीच संपले आहे किंवा आगामी काही काळात संपणार आहे.

पाकच्या विमान वाहतूक आस्थापनांच्या विमानांतून प्रवास करू नका ! – संयुक्त राष्ट्रांची त्यांच्या कर्मचार्‍यांना सूचना

आतंकवादी देश असणार्‍या पाकच्या विमान वाहतूक आस्थापनांवरच संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातली पाहिजे !