नवी देहली – कोरोनाचे संकट पुढील काही मास कायम राहिले, तर मग तो एक हंगामी आजाराच्या रूपात स्वत:ला विकसित करील. चीनमध्ये कोरोना विषाणू आढळून आल्याच्या घटनेला वर्षभरापेक्षा अधिक कालावधी होऊन गेला आहे. कोरोनाची लसही आली; मात्र कोरोनाचा संसर्ग कायम आहे. कोरोनाने हंगामी आजाराचे स्वरूप धारण केल्यास पालटणार्या वातावरणात लोकांना त्याच्याशी दोन हात करावे लागतील, अशी चेतावणी संयुक्त राष्ट्रांनी दिली आहे.
Read more: https://t.co/DclVHxsKsE#GeoNews #UN #coronavirus
— Geo English (@geonews_english) March 18, 2021