(म्हणे) ‘इस्रायलला धडा शिकवण्याची आवश्यकता !’ – तुर्कस्तानचे रशियाकडे मतप्रदर्शन

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या संघर्षात प्रथम आक्रमण कोणी केले, हे तुर्कस्तान लपवून का ठेवतो ? इस्रायल तुर्कस्तानसारख्या इस्लामी राष्ट्रांना पुरून उरला आहे, हा इतिहास आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे !

तुर्कस्तानचे राष्ट्रपती रेचेप तैय्यप एर्दोगॉन

अंकारा (तुर्कस्तान) – तुर्कस्तानचे राष्ट्रपती रेचेप तैय्यप एर्दोगॉन यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना दूरभाष करून इस्रालयला धडा शिकवण्याची आवश्यकता आहे, असे म्हटले आहे. तसेच पॅलेस्टाईनच्या लोकांच्या सुरक्षेसाठी एका आंतररराष्ट्रीय सुरक्षादल तैनात करण्याविषयी विचार करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. एर्दोगॉन यांनी जगभरातील इस्लामी देशांच्या प्रमुखांशी या विषयावर चर्चा केली आहे. यासह त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करून इस्रायलला योग्य संदेश देण्याचीही मागणी केली आहे.