विठ्ठला, समाजातील प्रत्येक घटकाला सुखी आणि समाधानी कर ! – मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठलचरणी साकडे

‘बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, त्याच्यावरील अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे. राज्य सुजलाम्, सुफलाम् होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत’, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातले.

तानाजी मालुसरे यांचे १३ वे वंशज सुभेदार श्री. कुणाल मालुसरे यांचा सत्कार

नरवीर तानाजी मालुसरे यांचे १३ वे वंशज सुभेदार श्री. कुणाल मालुसरे यांचा सत्कार हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केला, तसेच ‘गड-दुर्ग संवर्धन मोर्चा’ आणि आगामी चित्रपट ‘सुभेदार’ यांचे व्हिडिओ दाखवण्यात आले.

प्रत्येक मंदिर सरकारीकरणातून मुक्त होईपर्यंत लढा चालूच ठेवू ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

मंदिरांचे धन मंदिरांसाठी किंवा हिंदु धर्मासाठीच वापरण्यात यावे. भारतातील धर्मनिरपेक्ष सरकारे केवळ हिंदूंची मंदिरे बळकावून त्यातील धन घेण्याचा किंवा मंदिरांतील प्राचीन परंपरा पालटण्याचा प्रयत्न करतात; परंतु ते मशीद किंवा चर्च सरकारच्या नियंत्रणात आणू शकत नाहीत.

हिंदु राष्ट्राची चळवळ वैश्विक स्तरावर गतीमान करण्यासाठी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

गेल्या ११ वर्षांपासून ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित केले जात आहे. या वर्षी हे अधिवेशन ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ म्हणून आयोजित करण्यात येत आहे.

१६ ते २२ जून या कालावधीत गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे १६ ते २२ जून या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात वस्त्रसंहिता लागू करणार्‍या मंदिरांची संख्या झाली ११४ !

मंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी तेथे वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेणार्‍या देवस्थानांचे अभिनंदन ! असा निर्णय भारतातील सर्वत्रच्या मंदिरांनी घेणे आवश्यक !

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापिठाचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करावे !

हिंदु जनजागृती समितीची महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे मागणी !

स्‍वतःची आणि कार्यकर्त्‍यांची साधना व्‍हावी, यासाठी तळमळीने प्रयत्नरत असलेले हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र अन् छत्तीसगड राज्‍य संघटक श्री. सुनील घनवट !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य समन्‍वयक श्री. सुनील घनवट यांचा आज वाढदिवस आहे. त्‍या निमित्ताने नागपूर येथील सौ. गौरी विद्याधर जोशी यांना श्री. सुनील घनवट यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्‍यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे देत आहोत.

जळगाव जिल्ह्यातील ३० हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

जळगावमधील यावल येथील सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदिर, पारोळा येथील प्रसिद्ध श्री बालाजी मंदिर यांच्यासह तीसहून अधिक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला.

अमरावतीमधील ९ मंदिरांत वस्त्रसंहिता लागू होणार !

मंदिर संस्कृती रक्षणासाठी वस्त्रसंहिता अत्यावश्यक आहे. यासाठी आम्ही श्री महाकाली शक्तीपीठ याठिकाणी आजपासूनच फलक लावत आहोत. अमरावती जिल्ह्यातील अनेक मंदिरांमध्येही आम्ही असा फलक लावणार आहोत – पू. शक्तीमहाराज