आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २९ जून (वार्ता.) – ‘बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, त्याच्यावरील अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे. राज्य सुजलाम्, सुफलाम् होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत’, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या मुख्य शासकीय महापूजेच्या वेळी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.
जनसेवेचा जो वसा माझ्या हाती पांडुरंगाने सोपवला आहे तो असाच पुढे नेण्याचे बळ मला मिळावे एवढीच इच्छा मनोमन त्याच्याकडे व्यक्त केली. https://t.co/IQGEBNf3Zj pic.twitter.com/wxGjxRGYqp
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 29, 2023
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे, तसेच अहिल्यानगर येथील मानाचे वारकरी दांपत्य श्री. भाऊसाहेब काळे अन् त्यांच्या पत्नी सौ. मंगल भाऊसाहेब काळे यांच्यासमवेत श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली.
यंदा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मुक्काम पोस्ट वाकडीचे भाऊसाहेब मोहनीराज काळे आणि सौ.मंगल भाऊसाहेब काळे या मानाच्या वारकरी दांपत्यासह शासकीय पूजा करण्याचे सौभाग्य आम्हाला मिळाले. हे माऊली गेल्या २५ वर्षांपासून भास्कर गिरी महाराज यांच्यासोबत देवगड ते पंढरपूर अशी पायी… https://t.co/vTtU1uxey6 pic.twitter.com/ZPXq04xBLk
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 29, 2023
महापूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आयोजित मानाच्या वारकर्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.
सावळें सुंदर रूप मनोहर… आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रखुमाईची विधीवत शासकीय महापूजा.. pic.twitter.com/61admr2zRJ
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 29, 2023
१. या वेळी महसूल, पशूसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉ. तानाजी सावंत, ग्रामविकास आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.
२. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ‘‘आषाढी वारीनिमित्त पंढरी आणि परिसर अवघा पांडुरंगमय झाला आहे. आषाढी वारीत वारकर्यांच्या आरोग्याला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यासाठी ३ ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरातून भाविकांची आरोग्य सेवा करणे, हे श्री विठ्ठलाची पुजा करण्यासारखेच आहे.’’
शासन आपल्या दारी या अभियानाला राज्यभर उदंड प्रतिसाद मिळत आहे. राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ एकाच वेळी एकाच छताखाली देण्याचे काम होत आहे. व्यासपीठावर नियुक्तीपत्र देण्याचा हा कार्यक्रमही प्रथमच होत आहे. राज्यातील युती सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे.
महाआरोग्य… https://t.co/IWs5G9LxQ5 pic.twitter.com/2acLqTFcF9
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 29, 2023
सर्वांना विश्वासात घेऊन पंढरपूर शहर विकास आराखडा सिद्ध करण्यात येईल ! – मुख्यमंत्री
पंढरपूर नगरपरिषदेकडील कामांसाठी १०८ कोटी रुपये आणि शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी १०९ कोटी रुपयांच्या कामाला मान्यता देण्यात आली आहे. मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी ७३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पंढरपूर शहर विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊन सिद्ध करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी म्हणाले. ‘सलग दोन वर्षे मला आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मिळणे’, हे माझे भाग्य असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
मंदिर रक्षणाविषयी कार्य करणारे हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांचा सत्कार !शिवसेनेच्या धर्मवीर आध्यात्मिक आघाडीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. सध्या चालू असलेल्या मंदिर रक्षण, गडरक्षण, मंदिरांमध्ये लागू करण्यात येत असलेली वस्त्रसंहिता, अशा विविध विषयांच्या संदर्भात सक्रीयपणे कार्य केल्याविषयी श्री. घनवट यांचा व्यासपिठावर सत्कार करण्यात आला. |