हिमाचल प्रदेश विश्‍वविद्यालयात साम्यवाद्यांच्या विद्यार्थी संघटनेकडून अभाविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण

साम्यवाद्यांचा इतिहास हा हिंसाचाराचाच असल्याने त्यांच्याकडून याहून वेगळे काही घडण्याची शक्यता नाही. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे !

जेवणात अळ्या सापडल्याने १३ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली !

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणार्‍या विद्यापीठ प्रशासनातील संबंधितांची या प्रकरणी चौकशी करून दोषी आढळणार्‍यांना कठोर शिक्षा करावी !

महाबळेश्वर (सातारा) येथील ‘ब्लूमिंग डेल हायस्कूल’च्या वरच्या बाजूचा डोंगर खचला !

त्यामुळे शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महसूल विभागाने तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून विद्यार्थ्यांचे दुसरीकडे स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्रीय सशस्त्र दल आणि आसाम रायफल्स यांमध्ये अग्नीवीरांसाठी १० टक्के आरक्षण

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्स यांमध्ये भरतीसाठी अग्नीपथ योजनातील सैनिक ‘अग्नीवीर’ यांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला. या दलांमधील भरतीसाठी वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट देण्यात आली होती.

मंगळुरू विश्‍वविद्यालयात हिजाब घालून येण्याची मुसलमान विद्यार्थिनींची कायदाद्रोही मागणी

कर्नाटक उच्च न्यायालाने हिजाब घालण्याला अनुमती दिलेली नसतांना अशा प्रकारची मागणी करून न्यायालयाच्या आदेशाचा अवमानच केला जात आहे, हे लक्षात घ्या !

विश्‍वविद्यालयाच्या परिसरात असलेल्या मंदिराला विरोध म्हणून मशीद बांधण्याची साम्यवादी विद्यार्थी संघटनेची मागणी

साम्यवादाच्या नावाखाली हिंदूंचा विरोध करून मुसलमानांचे समर्थन करणारे कधीतरी धर्मनिरपेक्ष असू शकतात का ?

जे.एन्.यू.मध्ये श्रीरामनवमीची पूजेवरून अभाविप आणि साम्यवादी विद्यार्थी यांच्यात हाणामारी !

जे.एन्.यू.’मध्ये राष्ट्रघातकी आणि हिंदुद्वेषी विचारसरणीचे विद्यार्थी, शिक्षक यांची संख्या अधिक ! काँग्रेसच्या राज्यात यांना प्रोत्साहन मिळत होते. आता भाजपच्या राज्यात त्यांना प्रखर विरोध होत आहे. त्यातूनच गेल्या काही वर्षांत संघर्षाच्या घटना घडत आहेत !

पहिले हिजाब, फिर किताब ! – एम्.आय.एम्. विद्यार्थी संघटनेकडून बीडमध्ये फलकबाजी

यावरून मुसलमानांसाठी धर्मच प्रथम असतो, इतर सर्व गोष्टी दुय्यम असतात, हे सिद्ध होते. शिक्षणात मुसलमान मागास असल्याची ओरड करणारे आता याविषयी काही बोलतील का ?

राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या वेळी नागपूर येथे गोंधळ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन !

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दावा केला आहे की, २३ जानेवारीच्या सकाळी त्यांना परीक्षा केंद्रामधून एका विद्यार्थ्याने या केंद्रावर केंद्रप्रमुख येण्याच्या आधीच प्रश्नसंचाचे सील फोडण्यात आले आहेत, अशी माहिती दिली.

विद्यापिठांच्या स्वायतत्तेवर नियंत्रण आणण्याचा महाराष्ट्र शासनाचा डाव ! – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग

प्रभारी कुलपती पदावर राजकीय व्यक्ती नियुक्त करून शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप साधण्याचा डाव राज्य सरकार करत आहे, असा आरोप करत अशा प्रकारचे विधेयक तात्काळ रहित करण्यात यावे अन्यथा विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल !