‘बीबीसी न्यूज’चा हिंदुद्वेषी माहितीपट दाखवण्यावरून जे.एन्.यू.मध्ये वाद !

माहितीपटावर बंदी असतांना साम्यवादी विद्यार्थी संघटनेकडून माहितीपट दाखवण्याचा प्रयत्न !

नवी देहली – गुजरातमधील वर्ष २००२ ची दंगल आणि त्यात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा सहभाग अशा प्रकारे मांडणी केलेला ‘बीबीसी न्यूज’ या वृत्तवाहिनीचा माहितीपट येथील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयात (जे.एन्.यू.मध्ये) दाखवण्यावरून वाद झाला. साम्यवादी विचारांच्या ‘जे.एन्.एस्.यू.’ विद्यार्थी संघटनेने २४ जानेवारीच्या रात्री ९ वाजता माहितीपट दाखवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याला झालेल्या विरोधामुळे तो दाखवता आला नाही. विशेष म्हणजे केंद्रशासनाने या माहितीपटावर भारतात बंदी घातली असतांना तो येथे दाखवण्यात येणार होता.

जे.एन्.यू. प्रशासनाने माहितीपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी विश्‍वविद्यालयातील वीजपुरवठा आणि इंटरनेट खंडित केले, असा या विद्यार्थी संघटनेने आरोप केला आहे. त्यानंतर या माहितीपटाला विरोध करणारे विद्यार्थी आणि समर्थक विद्यार्थी यांच्यात वाद झाला. ‘या वेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली’, असा आरोप ‘जे.एन्.एस्.यू.’ संघटनेने केला.

संपादकीय भूमिका

अशा हिंदुद्वेषी आणि कायदाद्रोही साम्यवादी विद्यार्थी संघटनेवर सरकारने बंदी घातली पाहिजे !