सरकारला विरोध करतांना देशाचा द्वेष करू नये ! – सुन्नी स्टुडंट्स फेडरेशन

कोळीकोडे (केरळ) – देशातील सरकारला विरोध करणे योग्य आहे; मात्र त्याद्वारे देशाच्या विरोधात द्वेष निर्माण होऊ नये, असे ‘संपूर्ण केरळ जेम-इय्याथुल उलेमा’च्या ‘एपी कंथापूरम् अबूबकर मुसलियार’ गटाची विद्यार्थी संघटना सुन्नी स्टुडंट्स फेडरेशनच्या राज्य संमेलनामध्ये प्रस्ताव संमत केला आहे.

प्रस्ताव म्हटले आहे की, संघ परिवाराच्या द्वेषाच्या राजकारणाचा सामना करण्यासाठी द्वेष पसवणारे धोरण असू नये. आपला देश अनेक युगांपासून धर्मनिरपेक्ष राहिला आहे. त्याच्या संस्कृतीला कलंकित केले जाऊ नये.