पुण्यात एम्.पी.एस्.सी.च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन !

पुणे – राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबवण्यात यावा यांसह इतर मागण्यांसाठी एम्.पी.एस्.सी.च्या विद्यार्थ्यांनी येथे आंदोलन चालू केले आहे. जवळपास १ सहस्र विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले आहेत. वर्णनात्मक परीक्षेला आमचा विरोध नाही; पण त्यासाठी सिद्धता करण्यास पुरेसा वेळ मिळावा आणि स्पर्धा समान पातळीवर असावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. नवीन ‘पॅटर्न’ २०२५ मध्ये लागू केला, तर जुन्या पद्धतीने अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना शेवटच्या २ संधी मिळू शकतील. ‘पॅटर्न’ लागू करण्याची घाई झाली, तर विद्यार्थ्यांची हानी होईल. याविषयी सरकारने विचार करावा, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांकडून होत आहे. या वेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

विद्यार्थ्यांवर आंदोलन करण्याची वेळ का येते ? प्रशासन अगोदरच विचारपूर्वक कृती का करत नाही ?