छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान !
नवी देहली – येथील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात म्हणजे जेएनयूमध्ये १९ फेब्रुवारीला सायंकाळी शिवजयंती साजरी करण्यावरून साम्यवादी विद्यार्थी संघटना स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एस्.एफ्.आय.) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. एस्.एफ्.आय.च्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची तोडफोड केली. यावरून हा वाद झाला. या घटनेचे छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहे. वादाची माहिती मिळताच विश्वविद्यालयात मोठ्या प्रमाणात पोलीस पोचले. त्यांनी दोन्ही गटांतील विद्यार्थ्यांना शांत केले.
ABVP के सदस्यों ने वामपंथी कार्यकर्ताओं पर जेएनयू में छत्रपति शिवाजी महाराज की जयंती पर उनकी प्रतिमा तोड़ने का आरोप लगाया है-#ABVP #JNUClash #ChhatrapatiShivajiMaharaj #DelhiPolice #India https://t.co/JdhN2MbIK8
— ABP News (@ABPNews) February 20, 2023
१. यासंदर्भात अभाविपचे सचिव उमेशचंद्र अजमेरा म्हणाले की, शिवजयंतीनिमित्त आम्ही स्टुडंट ॲक्टिविटी सेंटर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवली होती. एस्.एफ्.आय.च्या विद्यार्थ्यांनी ही प्रतिमा बाहेर काढली. तसेच प्रतिमेवरील हार कचरापेटीत फेकून दिला. एस्.एफ्.आय.च्या विद्यार्थ्यांकडून विश्वविद्यालयातील वातावरण दूषित करण्यात येत असून प्रशासनाने याविरोधात कठोर कारवाई करावी.
२. नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाने याविषयी म्हटले की, अभाविपकडून ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होती, त्यासाठी विश्वविद्यालयाची अनुमती घेणे आवश्यक होते; मात्र अभाविपने अशी कोणतीही अनुमती घेतली नव्हती. त्यापूर्वीच या ठिकाणी काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून शिवाजी महाराजांची प्रतिमा हटवण्यात आली.
(सौजन्य :TIMES NOW)
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. – संपादक)
संपादकीय भूमिका
|