‘यज्ञाचा सकारात्मक परिणाम सभोवतालच्या वातावरणावर होतो’, हे सर्वश्रुत आहे. महर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वर्ष २०१८ पासून अनेक यज्ञयाग करण्यात आले. या यज्ञयागांच्या संदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने विपुल संशोधन केले आहे. या संशोधनातून ‘यज्ञयाग केल्याने यज्ञकुंड, यज्ञाचे यजमान अन् पुरोहित, यज्ञातील विविध घटक, तसेच सभोवतालचे वातावरण यांवर पुष्कळ सकारात्मक परिणाम होतो’, हे सिद्ध झाले आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या विविध विषयांवरील ग्रंथांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे
‘समाजात विविध विषयांवरील पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध असतात. ज्याला जो विषय आवडतो, तो त्या विषयावरील पुस्तक, ग्रंथ इत्यादी वाचतो. आपण जे वाचतो त्याचा परिणाम आपले मन आणि बुद्धी यांच्यावर होत असतो. तसेच हा परिणाम काही काळ आपल्यावर टिकून रहातो. याचे कारण हे की प्रत्येक वस्तूत तिची मूलभूत स्पंदने असतात. पुस्तक, ग्रंथ इत्यादींमधून जशा प्रकारची स्पंदने प्रक्षेपित होतात, तसा परिणाम वाचकांवर होतो.