‘समाजात विविध विषयांवरील पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध असतात. ज्याला जो विषय आवडतो, तो त्या विषयावरील पुस्तक, ग्रंथ इत्यादी वाचतो. आपण जे वाचतो त्याचा परिणाम आपले मन आणि बुद्धी यांच्यावर होत असतो. तसेच हा परिणाम काही काळ आपल्यावर टिकून रहातो. याचे कारण हे की प्रत्येक वस्तूत तिची मूलभूत स्पंदने असतात. पुस्तक, ग्रंथ इत्यादींमधून जशा प्रकारची स्पंदने प्रक्षेपित होतात, तसा परिणाम वाचकांवर होतो.
विविध विषयांवरील ग्रंथांतून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी काही प्रातिनिधिक ग्रंथांच्या ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या उपकरणाने वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील सकारात्मक अन् नकारात्मक ऊर्जा मोजता येतात. या चाचण्यांतील नोंदी पुढे दिल्या आहेत.
१. विविध विषयांवरील ग्रंथांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या नोंदी
टीपा : अ. सारणीत ग्रंथांचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ यांच्या नोंदी न देता केवळ सहजरीत्या उघडलेल्या पृष्ठांच्या नोंदी दिल्या आहेत.
आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या काही ग्रंथांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २३०० मीटरपेक्षाही अधिक होती; पण ती पूर्ण मोजण्यासाठी पुढे जाणे जागेच्या अभावामुळे शक्य नव्हते. त्यामुळे त्या ग्रंथांतील सकारात्मक ऊर्जा अचूक मोजण्यासाठी ती लोलकाने मोजण्यात आली.
इ. सारणीतील ग्रंथांच्या नोंदींचा क्रम ग्रंथांतील सकारात्मक ऊर्जेच्या चढत्या क्रमाने घेतला आहे.
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’
या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत. |
वरील नोंदींतून पुढील सूत्रे लक्षात येतात.
अ. सारणीतील पहिल्या ५ ग्रंथांमध्ये अधिक प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आणि अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली.
आ. उन्नत आणि अभ्यासक यांनी धर्मग्रंथाविषयी लिहिलेल्या ग्रंथांत नकारात्मक ऊर्जा काहीच नसून अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली.
इ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या शिष्या डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांनी लिहिलेल्या ग्रंथांत नकारात्मक ऊर्जा काहीच नसून उत्तरोत्तर अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली.
ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या ग्रंथांत नकारात्मक ऊर्जा काहीच नसून उत्तरोत्तर पुष्कळ अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली.
उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन या ग्रंथांत सर्वाधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. या ग्रंथांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २० ते २०५ किलोमीटर एवढी आहे. हे पुष्कळच वैशिष्ट्यपूर्ण आहे.
२. ग्रंथांच्या नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
२ अ. ग्रंथातून प्रक्षेपित होणारी स्पंदने विविध घटकांवर अवलंबून असणे : एखाद्या ग्रंथातून प्रक्षेपित होणारी स्पंदने विविध घटकांवर अवलंबून असतात, उदा. ग्रंथ लिखाणाचा उद्देश, ग्रंथाचा विषय आणि त्याची मांडणी, ग्रंथाची भाषा अन् लिपी, लिखाणाचे व्याकरण आणि संकलन, लेखकाची आध्यात्मिक पातळी अन् त्याला आध्यात्मिक त्रास असणे किंवा नसणे, ग्रंथ-निर्मितीच्या संदर्भात विविध टप्प्यांवर केल्या जाणार्या कृती, उदा. मुद्रितशोधन, संरचना, मुखपृष्ठ अन् मलपृष्ठ यांची संकल्पना आणि त्यांवरील चित्रे अन् मजकूर इत्यादी. थोडक्यात हे सर्व घटक जेवढे सात्त्विक असतील, तेवढे त्या ग्रंथातून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे प्रमाण अधिक असते.
२ आ. सर्वसाधारण लेखकाचे लिखाण अधिकतर बुद्धीच्या स्तरावरील असणे : सर्वसाधारण लेखक एखाद्या विषयावर लिखाण करतांना त्या विषयाचा अभ्यास करून, तसेच त्यांना आलेले विविध अनुभव इत्यादींचा आधारे लिखाण करतात. हे लिखाण अधिकतर बुद्धीच्या स्तरावर होत असते. त्यामुळे त्यामध्ये अनेक त्रुटी राहू शकतात. त्रुटी जेवढ्या अधिक तेवढा त्यांचा लिखाणातून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांवर नकारात्मक परिणाम होतो.
२ इ. डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांनी लिहिलेल्या ग्रंथांतून भाव आणि चैतन्य यांची स्पंदने प्रक्षेपित होणे : प.पू. भक्तराज महाराज यांच्या शिष्या डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी लिहिलेल्या ग्रंथांतून त्यांचा ३०-३५ वर्षांचा साधनाप्रवास प्रतिबिंबित होतो. त्यांचे लिखाण भावाच्या स्तरावरील आहे. श्रीगुरूंप्रतीचा भाव त्यांच्या लिखाणातून पदोपदी अनुभवण्यास येतो. डॉ. (सौ.) कुंदा आठवले स्वतः उत्तम संकलक आहेत. त्यांचे सोप्या भाषेतील ओघवते लिखाण मनाला भावते आणि त्यातून आनंद मिळतो. डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी लिहिलेल्या ग्रंथांतून भाव आणि चैतन्य यांची स्पंदने प्रक्षेपित होत आहेत.

२ ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या ग्रंथांच्या विषयानुरूप त्यातून शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची स्पंदने प्रक्षेपित होणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे गत अनेक वर्षांपासून विविध विषयांवरील ग्रंथ, नियतकालिके इत्यादींचे वाचन करतात. ‘प्रत्येक गोष्टीतून काहीतरी चांगले शिकता येते’, असा त्यांचा व्यापक दृष्टीकोन असल्याने ते विविध विषयांवरील ग्रंथ, पुस्तके, नियतकालिके इत्यादींचे वाचन करतांना त्यातील उपयुक्त लिखाण खुणा करून देण्याची सेवा (लिखाण निवडण्याची सेवा) वयाच्या ८१ व्या वर्षीही तेवढ्याच उत्साहाने करत आहेत. त्यांनी खुणा करून दिलेल्या लिखाणाचे टंकलेखन करून मग त्याचे संकलन करण्यात येते. त्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे लिखाण पडताळून अंतिम करतात. यातील आवश्यक ते लिखाण त्या त्या विषयांशी संबंधित सनातन-निर्मित ग्रंथांमध्ये संदर्भासह समाविष्ट करण्यात येते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या ग्रंथांच्या विषयानुरूप त्यातून शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची स्पंदने प्रक्षेपित होत आहेत.
२ उ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथांतून उच्चस्तरीय सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा संपूर्ण जीवनपट उलगडणारे छायाचित्रमय जीवनदर्शन भाग १ ते ६ हे सर्व ग्रंथ अप्रतिम आहेत. हे ग्रंथ हातात धरून किंवा त्याकडे पाहून पुष्कळ चैतन्य जाणवते. हे ग्रंथ वाचतांना साधक भावविभोर होतात आणि भावविश्वात रममाण होतात. या ग्रंथांतील छायाचित्रे आणि मजकूर यांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असल्याची अनुभूती अनेकांनी घेतली आहे. चाचण्यांतील नोंदींतून ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथांत किती मोठ्या प्रमाणावर चैतन्य (सकारात्मक ऊर्जा) कार्यरत आहे, हे लक्षात येते. या चैतन्यमय ग्रंथांचे वाचन करतांना साधक आणि वाचक यांचे मन अन् बुद्धी यांच्यावर पुष्कळ सकारात्मक परिणाम होतात. तसेच त्यांना त्यांच्या भावानुसार ग्रंथांच्या संदर्भात आध्यात्मिक अनुभूतीही येतात. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन ग्रंथ हे साधकांसाठी, तसेच पुढील अनेक पिढ्यांसाठी चैतन्याचा अखंड स्रोत आहे.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (५.९.२०२४)
ई-मेल : [email protected]
सनातनचे ग्रंथ ‘ऑनलाईन’ खरेदी करण्यासाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३ १५३१७
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |