दिवाळीच्या काळात आणि एरव्हीही मेणाच्या पणतीचा वापर टाळून तिळाचे तेल आणि कापसाची वात घालून लावलेल्या मातीच्या पारंपरिक पणतीचा वापर करणे श्रेयस्कर !
मेण हा घटक मानवनिर्मित आहे, तर माती, तिळाचे तेल आणि कापूस हे घटक निसर्गदत्त आहेत. सर्वसामान्यतः नैसर्गिक घटकांत सत्त्वगुण प्रधान असतो, तर अनैसर्गिक (कृत्रिम) घटकांत तमोगुण प्रधान असतो. ज्या घटकात जो गुण प्रधान असतो, तशी स्पंदने त्या घटकातून वातावरणात प्रक्षेपित होतात…