नवरात्रीच्या काळात महर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात करण्यात आलेल्या यागांच्या संदर्भातील संशोधन !
‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील स्वयंपाकघरात एका लहान देवघरात श्री अन्नपूर्णादेवीची मूर्ती आहे. स्वयंपाकघरात सेवा करणारे साधक-साधिका देवीची भावपूर्ण प्रार्थना करून सेवा करतात. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू यांनी सांगितले, ‘श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीतील चैतन्यात वाढ झाली आहे. तिचा रंग सुवर्णासम झाला आहे.’ श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू यांनी या वेळी असेही सांगितले की, ‘नवरात्रीच्या काळात आश्रमात होणार्या यज्ञयागांचा श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीवर काय परिणामहोतो ?’, याचे संशोधन करूया. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार संशोधनासाठी देवीच्या मूर्तीची एक आड एक दिवस छायाचित्रे काढण्यात आली. याविषयीचे संशोधन पुढे दिले आहे.

(भाग २)
लेखाचा भाग १ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/863577.html
१. नवरात्रीच्या काळात केलेल्या यागांचा श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीवर पुष्कळ सकारात्मक परिणाम होणे
श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. नवरात्रीच्या काळात श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीतील चैतन्यात उत्तरोत्तर वाढ होत गेली आणि विजयादशमीच्या दिवशी तिच्यातील सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक झाली. श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीच्यानोंदी पुढे दिल्या आहेत.
टीप : ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीतील सकारात्मक ऊर्जा मोजण्यासाठी चाचणीस्थळी जागा अपुरी पडल्याने ३० मीटर पुढील प्रभावळी लोलकाने मोजण्यात आल्या.
टीप : १२.१०.२०२४ या दिवशी विजयादशमी (दसरा) होता. या दिवशी महर्षींच्या आज्ञेने आश्रमात महामृत्युंजय याग करण्यात आला होता.
वरील नोंदींतून पुढील सूत्रे लक्षात आली.

१ अ. महर्षींनी नवरात्रीतील पहिले ६ दिवस श्री शाकंभरीदेवीचा याग आणि त्यानंतर पुढील ३ दिवस श्री चंडीदेवीचा याग करण्यास सांगणे, म्हणजे जणू दुग्धशर्करा योग ! : नवरात्रीतील पहिल्या ६ दिवसांत श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीतील चैतन्यात उत्तरोत्तर वाढ होत गेली. याचे कारण हे की, श्री शाकंभरीदेवी ही श्री अन्नपूर्णादेवीचे रूप आहे. यागाच्या वेळी देवीचे तत्त्व (चैतन्य) यागाच्या ठिकाणी ठेवलेल्या तिच्या चित्रात आकृष्ट झाले, तसे ते देवीच्या मूर्तीतही आकृष्ट झाले. विशेष म्हणजे श्री शाकंभरीदेवीचा याग पूर्ण होऊन २ दिवस उलटून गेल्यानंतरही देवीच्या मूर्तीतील चैतन्यात आणखीन वाढ झाली. नवरात्रात देवीचे तत्त्व एरव्हीपेक्षा अधिक प्रमाणात कार्यरत असते. महर्षींनी याच काळात श्री शाकंभरीदेवीचा आणि श्री चंडीदेवीचा याग करण्यास सांगून साधकांकडून एक प्रकारे देवीची उपासना करवून घेतली. ‘यागांच्या माध्यमातून साधकांना येणार्या कठीण काळात तरून जाण्यासाठी देवीचे कृपाशीर्वाद लाभले’, असे जाणवले.
१ आ. विजयादशमीला (दसर्याच्या दिवशी) श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीतील चैतन्यात आणखीन वाढ होणे : दसर्याच्या दिवशी (१२.१०.२०२४ या दिवशी) श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीतील सकारात्मक ऊर्जा २६५० मीटर, म्हणजे सर्वाधिक झाली. या दिवशी विजयादशमी होती. महर्षींच्या आज्ञेने या दिवशी महामृत्युंजय याग करण्यात आला होता, तसेच यागांची महापूर्णाहुतीही करण्यात आली होती. यामुळे वातावरण अतिशय चैतन्यमय बनले होते. याचा सुपरिणाम देवीच्या मूर्तीवर होऊन तिच्यातील चैतन्यात आणखीन वाढ झाली.
१ इ. नवरात्र होऊन १ सप्ताह उलटून गेल्यानंतरही श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीतील चैतन्य टिकून रहाणे : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीच्या मूर्तीतील सकारात्मक ऊर्जा ३२० मीटर आणि ९ व्या दिवशी ती १९८० मीटर झाली. यातून नवरात्रीत देवीच्या मूर्तीतील सकारात्मक ऊर्जेत उत्तरोत्तर वाढ होत गेली, हे लक्षात येते. नवरात्रीनंतर ८ दिवसांनी (१९.१०.२०२४ या दिवशी) देवीच्या मूर्तीतील सकारात्मक ऊर्जा १८२० मीटर होती. यातून ‘नवरात्रीचा, तसेच त्या काळात झालेल्या यागांचा देवीच्या मूर्तीवर झालेला सकारात्मक परिणाम नवरात्र होऊन १ सप्ताह उलटून गेल्यानंतरही टिकून आहे’, असे लक्षात येते.
एकूणच या संशोधनातून नवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व, तसेच नवरात्रीच्या काळात महर्षींनी यज्ञयागांच्या माध्यमातून साधकांकडून करवून घेतलेल्या देवी-उपासनेचे महत्त्व अधोरेखित होते.’
लेखाच्या पुढील भागात आपण ‘विजयादशमीला झालेल्या महामृत्यूंजय यागाचा यागातील घटकांवर काय परिणाम झाला?’, हे पाहू.
(क्रमश: पुढच्या रविवारी)
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२०.११.२०२४)
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi870264.html