माहीम गडावरील अतिक्रमण शासनाने हटवले !

अतिक्रमण करून संपूर्ण गड बळकवण्यात आलेल्या माहीम गडावरील अतिक्रमण अखेर राज्यशासनाने हटवले. मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमण करणार्‍यांनी गडाचे मुख्यद्वार बंद करून प्रवेशद्वारापासूनच गडाच्या आतमध्ये घरे बांधली होती.

मनसेच्या आक्रमक पवित्र्यामुळे ‘जश्‍न-ए-दिवाळी’ची विद्युत् रोषणाई  हटवली !

कुर्ला येथील ‘फिनिक्स’ या प्रसिद्ध मॉलच्या बाहेर दिवाळी या हिंदूंच्या पवित्र सणानिमित्र ‘शुभ दीपावली’ किंवा ‘दिवाळीच्या शुभेच्छा’ यांऐवजी चक्क ‘जश्‍न-ए-दिवाळी’ अशी इस्लामप्रमाणे शुभेच्छा देणारी विद्युत् रोषणाईची आरास मनसेच्या कार्यकर्त्यांनी मॉलच्या व्यवस्थापकांना हटवण्यास भाग पाडली.  

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे ३१० जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

अनेक शतकांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी बलपूर्वक, आमिष किंवा अन्य कारणांमुळे हिंदु धर्माचा त्याग केलेल्यांना परत हिंदु धर्मात यायचे असेल, तर अशांसाठी आता सरकारनेच पुढाकार घेतला पाहिजे !

BhagwadGeetaForMBAcourse : अलाहाबाद विश्‍वविद्यालयात व्यवस्थापनाच्या पदवी अभ्यासक्रमात शिकवण्यात येणार भगवद्गीता !

हिंदु धर्माची अद्वितीय शिकवण ही सार्वत्रिक, सार्वकालिक आणि सर्वच लोकांसाठी उपयुक्त आहे. असा अभ्यासक्रम चालू केल्याविषयी अलाहाबाद विश्‍वविद्यालयाचे अभिनंदन !

माण आणि खटाव तालुके १५ दिवसांत दुष्काळी घोषित करा ! – डॉ. दिलीप येळगावकर, भाजपचे माजी आमदार

राज्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील माण आणि खटाव या तालुक्यांचा समावेश झालेला नाही. यामागे पर्जन्य अनुशेषाची माहिती योग्य पद्धतीने महसूल यंत्रणेकडून गोळा केली जात नाही, हेच मुख्य कारण आहे.

मुनावळे (जिल्हा सातारा) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ उभारणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

जिल्ह्यातील जावली तालुक्यातील मुनावळे येथे अत्याधुनिक आणि सर्व सोयींनी युक्त असे आंतरराष्ट्रीय प्रतीचे पर्यटन स्थळ विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून १०५ गावांतील स्थानिकांना रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होणार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

छत्रपती संभाजीनगर येथील बागेश्वर धामच्या दरबारात २ लाख लोकांच्या भोजनाची व्यवस्था !

छत्रपती संभाजीनगर शहरात बागेश्वर धाम येथील धीरेंद्र  शास्त्री महाराज यांच्या सोहळ्याच्या निमित्ताने चैतन्य आणि संपूर्ण उत्साहाचे वातावरण पसरले आहे. संपूर्ण शहरभर फलक लागले आहेत. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री हे ३  दिवसांच्या श्रीराम कथेच्या निमित्ताने प्रथमच शहरात आले आहेत.

सरकारने मराठा समाजाशी चर्चा करून आरक्षण द्यावे ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे; कारण जेव्हा देश गुलामगिरीत होता, तेव्हा शौर्याने स्वातंत्र्य मिळवून देण्याचे काम मराठा समाजाने केले आहे. सरकारने मराठा समाजाशी चर्चा करून त्यांना आरक्षण दिले पाहिजे.

आता सहन करण्याच्या पलीकडे गेले असून आम्ही बुलडोजर चालवण्यास प्रारंभ केला, तर थांबणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय

गेंड्याच्या कातडीच्या सरकारांवर अशा फटकारण्याचा काहीच परिणाम होणार नाही आणि जनतेला जीवघेण्या प्रदूषणाला प्रतिवर्षी सामोरे जावे लागणार. त्यामुळे न्यायालयाने स्वतः यावर जातीने लक्ष देऊन प्रदूषण संपवण्यासाठी प्रयत्न करावेत, असेच जनतेला वाटते !

राजापूर येथे ‘हलालमुक्त’ दिवाळीच्या खरेदीला प्रारंभ !

‘कारण नसतांना मुसलमानेतर ग्राहकांच्या माथी ‘हलाल प्रमाणित’ उत्पादने मारली जात आहेत.’, या गोष्टींचा विरोध केल्यामुळे विवेक गुरव यांचे कौतुक करण्यात आले.