मुंबईकरांनी एका दिवसात १५० कोटी रुपयांचे फटाके फोडले !

फटाक्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करून प्रदूषण वाढवण्यापेक्षा त्या पैशांचा राष्ट्र-धर्म कार्यासाठी विनियोग करावा !

२०० गुणांच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना २०० पेक्षा जास्त गुण !

महात्मा जोतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचा भोंगळ अन् हास्यास्पद कारभार !

रस्ते अपघातात घायाळ झालेल्यांना साहाय्य करणार्‍यांना १५ सहस्र ते १ लाख रुपये मिळणार

अपघातात घायाळ झालेल्यांना साहाय्य करणार्‍यांना सरकार पैसे देते, तरीही लोक साहाय्यासाठी पुढे येत नाहीत. यामागील कारणांचाही सरकारने शोध घेऊन ती दूर करणे आवश्यक आहे !

दिवाळीनंतर उत्तरखंडमध्ये समान नागरी कायदा संमत होण्याची शक्यता !

एकेक राज्यात हा कायदा करण्यापेक्षा संपूर्ण देशात करणे आवश्यक आहे !

कोलकात्यात ३१ डिसेंबरपासून अंडरवॉटर मेट्रोचा होणार प्रारंभ

देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो रेल्वे ३१ डिसेंबर २०२३ या दिवशी कोलकातामध्ये धावणार आहे. भूमीपासून ३३ मीटर खाली आणि हुगळी नदीतळाच्या १३ मीटर खाली ५२० मीटर लांबीच्या बोगद्यात रुळ टाकण्यात आले आहेत.

१४ नोव्हेंबर या दिवशी मंदिरांमध्ये गोपूजा करा ! – धर्मादाय विभाग, कर्नाटक

गोपूजा करण्याचा आदेश देणार्‍या कर्नाटकातील काँग्रेस सरकारने गोहत्या होणार नाही, याकडेही तितकेच लक्ष द्यावे !

Rachin Ravindra Evil Eye : न्यूझीलंडचा भारतीय वंशाचा क्रिकेटपटू रचिन रवींद्र यांची त्यांच्या आजीने काढली दृष्ट !

आता देशातील तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि अंनिस सारख्या संघटना रचिन यांच्या आजीला अंधश्रद्धाळू ठरवतील !

Robot kills worker in South Korea : दक्षिण कोरियात ‘सेंसर’ नादुरुस्त झाल्याने एका रोबोटने एका कर्मचार्‍याला जखडून केले ठार !

विज्ञानाच्या अतिरेकाचेच हे फलित नव्हे का ?

हासन (कर्नाटक) येथे हसनंबा मंदिराबाहेरील चेंगराचेंगरीत काही जण घायाळ

हासन येथील हसनंबा मंदिराबाहेर भाविकांवर विजेची तार कोसळल्याने भीतीपोटी धावाधाव झाल्याने चेंगराचेंगरी झाली. यात काही जण घायाळ झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

आडेली (वेंगुर्ला, सिंधुदुर्ग) येथे रेशन दुकानात निकृष्ट धान्य : पुरवठादारावर कारवाईची मागणी

धान्य दुकानावर धान्य वितरण चालू असतांना तांदुळाच्या पोत्यामध्ये ‘प्लास्टिक’ पिशवीत लालसर रंगाचे ‘चायनीज’ सदृश पदार्थ असल्याचे निदर्शनास आले, तसेच तांदुळाच्या पोत्यामध्ये किडे आणि अळ्या सापडल्या, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.