चंद्रपूर येथील पत्रकार लिमेशकुमार जंगम यांना ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक !

असे पत्रकार समाजात काय आदर्श निर्माण करणार ?

घटस्फोट घेण्याला ‘डायवोर्स रिंग’तून मिळाले ओंगळवाणे रूप !

आत्मसन्मानाच्या नि अहंकाराच्या पोटी आजची तरुण आणि मध्यमवयीन पिढी यांच्यात अशा गोष्टींचा शिरकाव झाला आहे. कुटुंब आणि त्यान्वये समाजव्यवस्था मोडकळीस आणण्याचे हे संकेत असून यातून भविष्यात आपल्यासाठी काय वाढून ठेवले आहे ?, याचा थोडातरी अंदाज यातून येऊ शकेल !

पुणे येथे मतदार जागृतीच्या फलकावर ‘इन्कलाब झिंदाबाद’, ‘नोटा’ असे लिहले !

भारतात राबवण्यात येणारी लोकशाही प्रणाली साम्यवाद्यांना मान्य नाही. ज्या प्रमाणे जे.एन्.यू. आणि अन्य शैक्षणिक संस्था यांमध्ये साम्यवाद्यांचा शिरकाव झाला आहे, तसा तो ‘गोखले संस्थे’तही झाला नाही ना, याचा शोध घेणे आवश्यक !

आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय !

यआयटी गुवाहाटीचा २० वर्षीय विद्यार्थी त्याच्या वसतिगृहात मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. कुटुंबियांनी आरोप केला की, त्यांच्या मुलावर रॅगिंग (छळ) केल्यानंतर त्याची हत्या करण्यात आली.

अयोध्येतील श्रीराममंदिरात माजी सनदी अधिकार्‍याने दिले सोन्याचे रामचरितमानस !

अयोध्या येथील श्रीराममंदिरासाठी मध्यप्रदेशातील माजी सनदी अधिकारी सुब्रह्मण्यम् लक्ष्मी नारायण यांनी सोन्याचे रामचरितमानस भेट दिले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी या रामचरितमानसची मंदिरातील गर्भगृहात स्थापना करण्यात आली.

संपूर्ण देशासाठी केंद्र सरकारने बनवले एकच पंचांग !

केंद्र सरकारकडून आता देशातील हिंदूंसाठी एकच पंचांग बनवण्यात आले आहे. यामुळे सण-उत्सव, उपवास, सुट्या साजरे करतांना येणार्‍या व्यावहारिक अडचणी दूर होतील, असे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत १४ सहस्र ७५३ तक्रारी !

लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक घोषित झाल्यापासून निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर महाराष्ट्रातून १४ सहस्र ७५३ तक्रारी करण्यात आल्या. आतापर्यंत यांतील १४ सहस्र ३६८ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली.

नाभा (पंजाब) येथे सरकारी महाविद्यालयात प्राचार्यांच्या दालनात विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार !

महाविद्यालयात आणि तेही प्राचार्यांच्या दालनात अशा घटना घडत असतील, तर जनतेला नैतिकेचे शिक्षण कोण देणार आणि विद्यार्थी कुणाकडे आदर्श म्हणून पहाणार ?

न्यायाधिशांनी अनेक मास निकाल न देता खटला राखून ठेवणे, हा चिंतेचा विषय ! – सरन्यायाधीश चंद्रचूड

न्यायाधीश १० महिन्यांहून अधिक काळ निकाल न देता खटला राखून ठेवतात. हा चिंतेचा विषय आहे, असे विधान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले.

कोपरखैरणे (नवी मुंबई) येथे लाखो लिटर पाण्याच्या गळतीमुळे चाळीत पूरपरिस्थिती !

अशा कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक ! महाराष्ट्रात आधीच पाणीटंचाई आहे. अशा मानवी चुकांमुळे पाण्याची नासाडी झाली त्याचे काय ? ती कोण भरून काढणार ?